पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोणी कंद उपकेंद्र व लोणी कंद ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने लोणी कंद गावातील ४५ वर्षांवरील ज्येष्ठ ग्रामस्थांना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एकाच दिवशी विक्रमी असे २२० ग्रामस्थांना कोविड लसीकरण करण्यात आले. डोंगरगाव ५९ तर फुलगाव १८८ पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपर्यंत २३७८ लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घेतला.
तर लोणी कंद येथे लसीकरणासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद, सरपंच सागर गायकवाड, उपसरपंच रामदास ढगे आदींनी पुढाकार घेतला. याबद्दल प्रदीप कंद यांनी समाधान व्यक्त करीत सर्वांचे कौतुक केले.
तसेच आरोग्य अधिकारी डाॅ. नीलिमा इनामदार, जयश्री नंदनवनकर, प्रियांका सातव कोलते, सोपान झुरुंगे, विमल गव्हाणे, सुरेखा गायकवाड, सोनाली काकडे, रघुनाथ माने, सचिन बुगे, नीता वसुले, आशा चव्हाण, आशा गायकवाड, अरुण पोतदार आदी प्रत्येक गावात जाऊन
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम राबवत आहे.
०८ लोणी कंद लस
लोणी कंद येथे कोरोना लसीकरणासाठी नागरिकांनी लावलेली रांग.