पुणे : पुणे शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि अजय काळभोर टोळीतील गुंडाकडून गुंडा स्कॉड उत्तर विभागाने २ गावठी पिस्तुल व चार काडतुसे हस्तगत केली आहे. दत्ता विठ्ठल आगलावे (वय २५, रा़ तुकारामनगर, शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे़. काळभोर टोळीची पिंपरी, चिंचवड, चिखली या भागात प्रचंड दहशत आहे आगलावे याच्याविरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे खुन, कट रचणे, दरोड्याचा प्रयत्न तसेच गावठी कट्टे, पिस्तुल बाळगणे असे ४ गुन्हे दाखल आहेत़. लोणावळा ग्रामीणमध्ये २, तळेगाव दाभाडे, चिंचवड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे़. चिंचवड पोलिसांनी आगलावे व अन्य दोघांना अटक करुन त्यांच्याकडून ३ पिस्तुल जप्त केली होती़. गुन्हे शाखेच्या उत्तर विभाग गुंडा स्कॉडचे पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी यापूर्वी या टोळीचा म्होरक्या अजय काळभोर व तिरुपती ऊर्फ बाब्या जाधव यांना २७ मार्च रोजी अटक करुन त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल व ३ काडतुसे जप्त केली होती़. ही शस्त्रे आगलावे यानेच त्यांना दिली होती़. याची माहिती मिळाल्यावर नाईकवाडी यांनी न्यायालयामार्फत आगलावे याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली़. त्यात त्याने मध्यप्रदेशातील उमरठी येथून आणलेली आणखी दोन गावठी पिस्तुल व ४ काडतुसे काढून दिली़. ही हत्यारे पुण्यातील ओळखीच्या लोकांना विक्री करुन पैसे कमविण्यासाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहायक निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी राजू मोरे, भालचंद्र बोरकर आदींनी ही कामगिरी केली़.
काळभोर टोळीतील गुंडाकडून दोन गावठी पिस्तुल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 3:18 PM
अजय काळभोर टोळीतील गुंडाकडून गुंडा स्कॉड उत्तर विभागाने २ गावठी पिस्तुल व चार काडतुसे हस्तगत केली आहे.
ठळक मुद्देओळखीच्या लोकांना विक्री करुन पैसे कमविण्यासाठी हत्यारे आणल्याचे तपासात निष्पन्न