अपघातग्रस्तांना पुणे येथील ससून दवाखान्यात दाखल करण्यात आले, तर काहींना दौंड येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. वारंवार ग्रामस्थ या रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी
संबधित ठेकेदारला करून सुद्धा या ठिकाणी मुरूम टाकला नाही. त्यामुळे वारंवार अपघात घडत आहे या अपघाताला कोण जबाबदार? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे.
बांधकाम विभाग दौंड येथील अधिकाऱ्र्यांना ग्रामस्थांनी फोनवर संपर्क करून माहिती देण्यात आली. मात्र, याकडे अधिकारी जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहे.
स्लोप काढूण मुरूम टाकण्यात यावा, अशी मागणी येथील शेतकरी, ग्रामस्थ करत आहे. अन्यथा ग्रमस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येईल ,असा ईशारा देण्यात आला आहे.