नारायणगाव - मंदिरातील दानपेट्या व मोटार सायकली चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून पकडले. या टोळीकडून ४ लाख रुपये किंमतीच्या ११ मोटर सायकली व मंदिरातील चोरीतील ५ हजार रुपये हस्तगत करण्यात आली. त्यांच्याकडून मोटारसायकल व मंदिरातील दानपेटी चोरीचे १९ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.या दुचाकी, दानपेट्या चोरणारी टोळी गजाआड दुचाकी, दानपेट्या चोरणारी टोळी गजाआड या चोरट्यांना आज (दि.८) जुन्नर न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी व एक अल्पवयीन मुलास बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.सोमनाथ सावळेराम जाधव (वय १९, रा. घारगाव करंदवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), भोºया ऊर्फ भावड्या वाल्मीक पथवे (वय २२) व एक अल्पवयीन मुलगा ( दोघेही रा. पांगरी, कोतुळ ता. अकोले, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळवंडी पुलाच्या जवळ सोमनाथ जाधव हा एक मोटारसायकल घेऊन संशयितपणे फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस नाईक दीपक साबळे, रामचंद्र शिंदे, भीमा लोंढे, धनंजय पालवे यांनी सोमनाथ याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे त्याचे नाव व माहिती विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी सुरू केली. यात त्याने त्यांच्याजवळ असलेली मोटार सायकल नारायणगाव येथून चोरली असल्याची कबुली दिली. सखोल चौकशीमध्ये त्याने भोºया ऊर्फ भावड्या पथवे व संतोष पथवे यांच्या मदतीने जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील विरोबा मंदिरामधील दानपेटी ,वारूळवाडी येथील साईबाबा मंदिरातील दानपेटी, खोडद येथील जगदंबा माता मंदिर व साळवाडी येथील कमला माता मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे ५ हजार रुपयांची चोरी तसेच आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळील चांडोली ,घारगाव (ता. संगमनेर) येथील काळमजाई मंदिर व जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील मंदिरातीळ दानपेटी फोडल्याची कबुली दिली आहे. अशा ७ मंदिरातील दानपेटी चोरीचे गुन्हे उघड नारायणगाव पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.खेड, मंचर, नारायणगाव, घारगाव, संगमनेर, येथुन चोरलेल्या एकूण ११ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून मोटारसायकल व मंदिरातील दानपेटी चोरीचे १९ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सोमनाथ जाधव व भोºया पथवे यांच्यावर आळेफाटा, घारगाव (संगमनेर) व अकोले (अहमदनगर) येथे मोटर सायकलचोरीचे गुन्हे दाखल आहेत.सहा महिन्यांतचार टोळ्या गजाआडनारायणगाव पोलिसांनी गेल्या ७ महिन्यांत मोटर सायकली चोरणाºया ४ टोळ्या पकडून त्यांच्याकडून ४४ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. घरफोडीतील चोरट्यांकडून ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. दोन देशी बनावटीचे कट्टे व एसटी बसस्थानकात बसमध्ये चढताना पैसे व दागिने चोरी करणाºया महिलांची टोळी पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
दुचाकी, दानपेट्या चोरणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 2:57 AM