शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

दुचाकींची गर्दी जाहली उदंड , प्रादेशिक परिवहन कडून शहरातील वाहनांची आकडेवारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 2:14 PM

पुणे :  पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता दुचाकीकरांचे शहर अशीच करुन द्यावी लागेल. शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० वर पोहचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इतकी आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ...

ठळक मुद्देवाहनसंख्या पोहचली ३६ लाख २७ हजारांवरगेल्या वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ९१० वाहनांची भर

पुणे :  पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता दुचाकीकरांचे शहर अशीच करुन द्यावी लागेल. शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० वर पोहचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इतकी आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ९१० वाहनांची भर पडली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षभरात (एप्रिल २०१७  ते मार्च २०१८) दुचाकींच्या संख्येत २ लाख ५ हजार ८०४ ने वाढ झाली आहे. चारचाकी वाहनांची संख्या ६ लाख ४५ हजार ६८३ वर पोहचली असून, त्यात ५६ हजार ४१० वाहनांची भर पडली. टॅक्सी कॅब, रिक्षा, ट्रक, लॉरी आणि डिलिव्हरी व्हॅनची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्कूल बस, रूग्णवाहिका, खासगी बस, ट्रक, टँकर, ट्रॅक्टर, ट्रेलर, मालवाहू वाहनांची विक्री गेल्या वर्षी इतकीच झाली आहे. रिक्षांचे परवाने खुले केल्याने यावर्षी तब्बल ८ हजार २२३ नवीन रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. आता शहरातील रिक्षांची संख्या ५३ हजार २२७ इतकी झाली आहे. टॅक्सी कॅबच्या संख्येत ५ हजार ६४८ने वाढ झाली असून, त्यांची संख्या २८ हजार ३४४ झाली आहे. चार चाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या ४ हजार ३५३ने वाढून ४७ हजार १३५ आणि तीन चाकी डिलिव्हरी व्हॅनची संख्या १ हजार ५२२ने वाढून ३३ हजार ८९५ झाली आहे. ट्रक-लॉरीची संख्या ३ हजार ८९० ने वाढून ३८ हजार ५९८ वर पोहोचली आहे. स्कूल बसच्या संख्येत २८३ने वाढ झाली असून, ते २ हजार ५६४ झाली. शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३१ लाख १५ हजार इतकी आहे. गेल्या ७ वर्षांत लोकसंख्येत ४ लाखांची वाढ गृहित धरली, तरी शहरातील वाहनांची संख्या दरडोईपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.  

---------------------------------

वाहन नोंदणीचे वार्षिक उड्डाणवाहन प्रकार     २०१३-१४     २०१४-१५     २०१५-१६     २०१६-१७       २०१७-१८दुचाकी         १,४५,७९४   १,६६,१९९      १,७८,१५७      १,७९,६७३       २,०५,८०४चारचाकी          ४१,५०७      ४५,९४४     ४६,६०९      ४९,७५५       ५६,४१०एकूण वाहने     १,९७,०२८      २,३३,५९६     २,४९,४७८      २,७०,३०७        २,८९,९१०

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर