युवराज अनिल वाघमारे (वय २१ रा. निरगुडे ता. जुन्नर), गणेश रामदास मुळे (वय ४० रा. गुंजाळवाडी ता. जुन्नर) असे चोरट्यांची नावे आहेत. नारायणगाव एसटी बसस्थानक येथे दोघेजन चोरीची मोटार सायकल विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली. पोलीसानी सापळा रचला. दोघे जन हे एक मोटर सायकल घेवून नारायणगाव स्थानकात आले. पोलीसांनी शिताफीने दोघांना अटक केली. त्यांच्याकडे मोटरसायकल बाबत विचारले असता मोटार सायकल ही जुन्नर येथून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. तर दुसरी दुचाकी ही पुष्पंजली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या आवारातून चोरी केल्याचे सांगितले.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उप निरीक्षक सानील धनवे पोलीस नाईक धनंजय पालवे, शैलेश वाघमारे, गोकुळ कोळी, दत्तात्रय ढेंबरे, अनिल तांबे या पथकाने केली.
फोटो : चोरलेली मोटर सायकलची विक्री करण्यासाठी नारायणगाव येथे आलेल्या दोन मोटार सायकल चोरांना पोलिसांनी अटक केली.