शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

शिक्षकाचे विद्यार्थिनींशी दोन वर्षे अश्लील वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2016 8:38 AM

विद्यार्थिनींनी विरोध केला, तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाहीत... विद्यालयातून काढून टाकू... तुमचीच बदनामी करू... त्यासाठी सहलीचे सेल्फी फोटो वापरू..

चाकण : विद्यार्थिनींनी विरोध केला, तर प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाहीत... विद्यालयातून काढून टाकू... तुमचीच बदनामी करू... त्यासाठी सहलीचे सेल्फी फोटो वापरू... अशा धमक्या देऊन गेली २ वर्षे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाचे धक्कादायक प्रताप समोर आले आहेत. चाकणजवळील वाकी (ता. खेड) हद्दीतील एका इंग्रजी मध्यमाच्या प्रशालेत हा प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींशी अत्यंत आक्षेपार्ह व अश्लील चाळे तो करीत असे. संबंधित प्रशालेच्या एककल्ली कारभारामुळे तक्रारी करण्यास विद्यार्थिनी धजत नव्हत्या. या २६ वर्षीय शिक्षकाचा छळ ‘त्या’ निमूटपणे सहन करीत होत्या. एका विद्यार्थिनीने त्याच्याविरोधात पालकांकडे तक्रार केल्यानंतर संपूर्ण प्रशालेत हा प्रकार पसरल्या आणि त्याला वाचा फुटली. एकीकडे स्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात असताना उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. त्यातच संबंधित शिक्षकाच्या संदर्भात प्रशालेच्या प्रशासनाने सुरुवातीला बोटचेपेपाणाचे धोरण घेतल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे : एका विद्यार्थिनीने या प्रकाराबाबत पालकांना सांगितल्यानंतर काही पालकांनी सोमवारी सकाळी त्याची चाकण पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस अधिकारी आणि संबंधित काही पालक प्रशालेत आले. या प्रकाराची कुणकुण लागताच संबंधित प्रशालेच्या प्रशासनाने संबंधित पालकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. ‘आम्हाला प्रथम सांगायला हवे होते. थेट पोलिसांत गेलात... आता याचा परिणाम भोगावा लागेल,’ असे त्यांनी संबंधितांना दटावले. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशालेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींशी संवाद साधून विचारपूस केली असता, हा शिक्षक विद्यार्थिनींशी लगट करणे, अत्यंत अश्लील प्रश्न विचारणे, विद्यार्थिनींना घरी फोन करणे व अनेक बीभत्स प्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले.प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर ‘पोलीस कारवाई करू नका, संबंधित शिक्षकाला तातडीने बडतर्फ करण्याचे आश्वासन’ त्यांनी दिले. दरम्यानच्या काळात इयत्ता आठवीमधील काही विद्यार्थिनी हीच तक्रार घेऊन पोलीस व प्रशासनाच्या समोर आल्या. त्यानंतर संबंधित प्रशासन व पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता सुरुवातीला कबूल न झालेल्या संबंधित शिक्षकाने नंतर आपल्या कुकर्मांचा पाढा वाचला.संबंधित प्रशालेच्या प्रशासनाने त्या नराधम शिक्षकाला तत्काळ बडतर्फ करणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात विद्यार्थिनींना पोलिसी कारवाईचा आणखी मनस्ताप नको, अशी भूमिका घेऊन संबंधित प्रशालेच्या दबावाने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे धारिष्ट कोणत्याही पालकांनी दाखविले नाही. मात्र, बालवयातील विद्यार्थिनींबाबत घडलेल्या या प्रकाराचा तीव्र निषेध सर्वच स्तरांतून होत आहे.