पिंपरी : ‘लखन’ या नावाच्या दोन मित्रांचा दुचाकी अपघातात रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगात असणाऱ्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, रक्तस्रावामुळे त्यांच्यावर मृत्यू ओढवला. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू आहे. या तरुणांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. हेल्मेट न वापरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी अडविल्यास शंभर रुपये दंड भरून स्वत:ची सुटका करून घेतली जाते. मात्र, हेल्मेट न वापरणे आपल्यासाठीच धोकादायक असल्याचे वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. रविवारी अशाच प्रकारे हेल्मेट न वापरणाऱ्या दोघांना जीव गमवावा लागला. मृतांमधील लखन कांबळे हा मित्रांसह भूमकरवस्ती येथे राहायला होता. सध्याची खोली बदलण्याचा त्याचा विचार होता. यासाठी बॅग आणण्यासाठी तो सकाळी नऊच्या सुमारास वाकडमधील विवेकानंदनगर येथे राहणाऱ्या नातेवाइकांकडे गेला होता. बॅग घेतल्यानंतर तेथून निघाला. दरम्यान, मित्र दंडगुलेला सोबत घेतले. लखन कांबळे दुचाकी चालवीत होता. वाकडगावाहून मानकर चौकाकडे येत असताना सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी भरधाव वेगातील दुचाकी मानकर चौकापासून जवळच अंतरावर दुभाजकाला घासली. त्यानंतर पंधरा ते वीस फुटांवर दुभाजकावरील आरएचएस/टी ३१ क्रमांकाच्या विजेचा खांबावर धडकली. भरधाव वेगात दुचाकीसह दोघेही खांबावर धडकल्याने ते रस्त्याच्या मधोमध उडून पडले, तर दुचाकी त्यांच्यापासून दहा ते बारा फूट दूर अंतरावर फेकली गेली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांनाही नागरिकांच्या मदतीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी घटनेची माहिती समजताच दोघांच्याही नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.हेल्मेटची डोकेदुखी नाहीरस्ते अपघातामध्ये हेल्मेट नसल्याने दगावलेल्या दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. हेल्मेटमुळे डोके बचावल्याने प्राणहानी होतनाही. हेल्मेट हाताळणे म्हणजे डोकेदुखी नसून स्वत:च्या सुरक्षा व बचावासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)
अतिवेगाने दोन तरुणांचा केला घात
By admin | Published: December 01, 2014 3:44 AM