आळंदी : इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन यात मंगळवारी रात्री युवक आणि युवती वाहून गेले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही.चंद्रकांत पुंडलीक गायकवाड (वय २५), असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तरुणीचे नाव समजू शकले नाही. येथील नवीन पुलाकडून चौंडीकडे हे दोघे वाहून जाताना दिसले. अंधारामुळे त्यांना वाचविणे शक्य झाले नाही. नगर परिषदेच्या बोटीनेही शोध घेण्यात आला. मात्र, ते सापडले नाहीत. अंधार असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. उद्या पुन्हा त्यांचा शोध घेण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागातील सफाई कामगार विजय पवार यांनी पथकासह शोधमोहीम सुरु केली. पावसाचा जोर वाढत असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे इंद्रायणी नदीकाठी येणाऱ्या भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आळंदीत इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 9:59 PM
इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन यात मंगळवारी रात्री युवक आणि युवती वाहून गेले.
ठळक मुद्देइंद्रायणी नदीकाठी येणाऱ्या भाविकांनी काळजी घेण्याचे आवाहन