चंदननगर: गणेश उत्सवामध्ये ईद-ए-मिलाद आल्यामुळे पोलिसांनी दिनांक 16 रोजी मिरवणूक काढण्यास मनाई केली होती. त्यामुळे गणपती झाल्यावर सर्व मुस्लिम बांधवांना पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे काही मंडळांनी शनिवारी तर काही मंडळांनी रविवारी काढल्या होत्या. त्यामुळे आज आज वडगावशेरीगावठाण येथील "जुलूस"च्या मिरवणुकीमध्ये शॉक बसून दोन तरुण मृत्युमुखी पडले. अभय अमोल वाघमारे( रा.वाडेश्वरनगर वडगावशेरी,वय 17) व जकरिया बिलाल शेख (वय 19,इनामदारशाळा वडगावशेरी) या दोन युवकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
चंदननगर पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने जुलूस मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत वडगावशेरी भाजी मंडई,मातोश्री मिनाताई बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक मनपा येथे मिम बॉईज ग्रुप यांच्या वतीने ट्रॅक्टरवर स्पीकरच्या भिंती उभ्या करून मिरवणूक सुरू होती.
सदर मिरवणूक साडे दहा ते अकरा दरम्यान आली असता घटना घडली. स्पीकरच्या भिंतींवर काही तरुण हातात झेंडे घेऊन नाचत होते. भाजी मंडई येथून वडगावशेरी गावठाण रस्त्याला मिरवणूक येतअसताना अभय वाघमारे यांच्या हातातील स्टीलच्या पाईप मधील झेंड्याला हाय टेन्शन वायरचा धक्का लागला. त्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून अभय वाघमारे जळून खाक झाला.
यावेळी त्याच्या शेजारी उभा असलेला जक्रीया शेख यालादेखील विजेचा शॉक लागला. त्याला उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले असता त्याचे देखील निधन झाले. याप्रकरणी दोन्हीही मृत तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत. वडगावशेरी येथील या दुर्दैवी घटनेमुळे मिरवणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्या.