पुणे : शहरातील ओढे-नाले यांच्यामध्ये बदल करताना शहर सुधारणा समितीची मान्यता घेऊनच संबंधित प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी यावा़, हा शहर सुधारणा समितीच्या शिफारसीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत वादात सापडला. ‘टायपिंग मिस्टेक’ झाल्याने सभेच्या विषय कार्यपत्रिकेवरील या प्रस्तावावर ‘नवीन मजकूराची चिठ्ठी चिटकविण्यात’ आली आहे, असे सांगण्यात आले. प्रशासनाकडे प्रस्तावाबाबतचे मूळ पत्र मागितल्यावर मात्र त्यांना सत्ताधाऱ्यांकडे पाहावे लागले. परिणामी शहर सुधारणा समितीचा हा प्रस्ताव तहकुब करण्याचा निर्णय घ्यावा लागला.पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला होता. बांधकाम व्यावसायिकाने परस्पर ओढे-नाले बंद करून तसेच प्रवाह बदलल्याने ही पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी येथून ‘पुढे ओढे-नाले यांच्यामध्ये बदल करण्यास मान्यता द्यावी अशी मुख्य सभेकडे शिफारस आअशा मजकूराचा मूळ प्रस्ताव छापून झालेल्या कार्यपत्रिकेवर होता़ हीच कार्यपत्रिका सभेच्या तीन दिवस आधीच नगरसेवकांही पाठविण्यात आलेली होती. मात्र, सभा सुरू झाल्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या नगरसेवकांच्या बाकांवर असलेल्या कार्यपत्रिकेत या विषयावरील शेवटच्या ओळीवर चिठ्ठी चिटकविल्याचे आढळून आले. हा विषय मान्यतेसाठी सभागृहात पुकारल्यावर, मूळ कार्यपत्रिका व नव्याने चिटकविलेल्या चिठ्ठीवर वेगळाच मजकूर असल्याचे काही नगरसेवकांच्या लक्षात आले. नव्याने चिटकविलेल्या चिठ्ठीत, पुढे ओढे-नाले यांच्या मध्ये बदल करताना, ‘शहर सुधारणा समितीमार्फत’ मुख्य सभेची मान्यता घेण्यात यावी, अशी मुख्यसभेकडे शिफारस आहे. हा मजकूर समाविष्ट करून शहर सुधारणा समितीचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न करून बदलेला हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.परंतू मुख्य सभेपूर्वी, ‘शहर सुधारणा समितीची’मान्यता घेण्याचा हा प्रयत्न व नव्याने चिठ्ठी चिटकवून केलेला संबंधितांचा खोटेपणा जास्त वेळ टिकू शकला नाही. नगरसेवकांना मिळालेल्या पूर्वीच्या कार्यपत्रिका व सभागृहातील बाकांवरील कार्यपत्रिका यातील तफावत लक्षात येताच नगरसेवक भैय्या जाधव, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी या विषयावरील मूळ ठरावाचे पत्र सभागृहात वाचून दाखवावे अशी मागणी केली. मात्र ठरावाचे मूळ पत्र व आजच्या चिठ्ठीतील मजकूर हा वेगळा असल्याने, नगरसचिव विभागातील अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाची वाट पाहणे पसंत केले. परिणामी सत्ताधाऱ्यांनीच ‘टायपिंग मिस्टेक’चे कारण सपशेल फसले गेल्याचे लक्षात आल्याने, हा विषय पुढील सभेपर्यंत तहकूब करीत या विषयाच्या वादावर पडदा टाकला. ----------
ओढे-नाले ‘बदलण्याची’ ‘टायपिंग मिस्टेक’ सत्ताधाऱ्यांना भोवली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:30 PM
‘शहर सुधारणा समितीची’मान्यता घेण्याचा हा प्रयत्न व नव्याने चिठ्ठी चिटकवून केलेला संबंधितांचा खोटेपणा जास्त वेळ टिकू शकला नाही.
ठळक मुद्देशहर सुधारणा समितीचा प्रस्ताव तहकुब हा विषय पुढील सभेपर्यंत तहकूब करत वादावर टाकला पडदा