शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

उद्योगनगरी जपतेय आयुर्वेदाचा वारसा

By admin | Published: April 30, 2017 5:05 AM

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जनसेवा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी एमआयडीसीमधील जे ब्लॉकमध्ये जनसेवा आयुर्वेद वनौषधी उद्यान प्रकल्प

- नितीन शिंदे,  भोसरी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जनसेवा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी एमआयडीसीमधील जे ब्लॉकमध्ये जनसेवा आयुर्वेद वनौषधी उद्यान प्रकल्प उभारण्यात आला. याच परिसरात ‘पर्यावरण संस्कार उद्यान’ या नावाने उद्यानरूपी जंगलच वसवले आहे. गेल्या २० वर्षांपासून दुर्मिळ पक्षी व वनस्पतींचे योग्य जतन या उद्यानात करण्यात येत आहे. जनसेवा वनौषधी उद्यान प्रामुख्याने आयुर्वेदिक वनस्पतींसाठी तयार करण्यात आले असून, दुर्मिळ औषधी वनस्पतींचे भांडारच जणू येथे पहावयास मिळते. दमा, संधिवात, हृदयविकार, कर्करोग अशा अनेक दुर्धर आजारांवर दर बुधवारी तज्ज्ञांच्या उपस्थितीत येथे रुग्णांना सल्ला व औषधे दिली जातात. बकुळ, चिंच, पारिजातक, अर्जुन, शिवण, अडुळसा, पळस, कोरफड, निवडुंग, हिरडा, बेहडा, वेगवेगळ्या वेली, कंद, मुळे अशा नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या तब्बल ४८0 औषधी बहुपयोगी वनस्पतींचे एक संग्रहालय येथे उभारण्यात आले आहे. शहरातील एकमेव औषधी वनस्पती उद्यान अनेक वर्षांपासून परिसरात फुलत असून, या उद्यानात आयुर्वेद क्षेत्रातील व डॉक्टरी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षक माहिती घेण्यासाठी येत असतात. पर्यावरण संस्कार उद्यानात विष्ववृत्तीय निमहरित अरण्य, पानझडी अरण्य, काटेरी अरण्य, गवताळ प्रदेशातील झाडे यांचे जतन करण्यात आले असून, याच परिसरात काही भागात रक्तरोहिडा, रक्तचंदन, वावडिंग, निंबारा, आवळा, चित्रक, पाडळ, डिकेमली, सागरगोटा, वेरवंड, सर्पगंधा, गुंज, हळद, शिकेकाई, वाळा, गोकर्णी, महदूंग, दालचिनी, शेंदरी अशा विविध दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींचे जंगलच वसवण्यात आले आहे. प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या ठरावीक निसर्गचक्राला बाधा निर्माण होऊ न देता काळजीपूर्वक जतन केलेल्या या दोन्ही उद्यानांत परिसरातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, पर्यावरण अभ्यासक, प्राणिमित्र व पक्षी निरीक्षकांची नेहमीच गर्दी असते.दुर्मिळ पक्षी अन् सापएकूण साडेपाच हेक्टर परिसरात पसरलेल्या या जंगलरूपी उद्यानात धामण, मण्यार, घोणस, फुरसे, अजगर, मांडूळ अशा विषारी व बिनविषारी सापांच्या प्रजाती आढळतात. मोर आणि लांडोरीचे जोडपेही येथे आहे. पारवा, पोपट, विविध जातींच्या चिमण्या, कोकीळ, सुतारपक्षी, घुबड हे पक्षी येथील असंख्य झाडांवर चिमुकली घरटी बांधून मुक्त संचार करताना दिसून येतात. या उद्यानात एक कृत्रिम तलाव बांधण्यात आला असून, त्यात शेकडो मासे आढळतात. येथील कर्मचारी वर्गही पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे बांधणे, त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करणे अशी कामे चोखपणे पार पाडतात.१९९७मध्ये तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी पर्यावरण संस्कार उद्यानाची संकल्पना आणली. उद्यान म्हणजे हिरवेगार लॉन, कारंजे, खेळणी, कृत्रिम धबधबे असा समज बाजूला सारून जंगलात भ्रमंती केल्यासारखा अनुभव नागरिकांना घेता यावा व दुर्मिळ पक्षी व वनस्पतींचे संगोपन व्हावे यासाठी हे उद्यान बनवण्यात आले. एमआयडीसीतील हे दोन्ही प्रकल्प शैक्षणिक व समाजोपयोगी हेतूने विकसित केले असून, संपूर्ण पुण्यात कोठेही सापडणार नाहीत अशा दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व संगोपन महापालिका करीत आहे. या वनस्पतींना नैसर्गिक पद्धतीने जोपासल्याने त्यांची चांगली वाढ होत आहे. परिसरातील सर्व विद्यार्थी व अभ्यासकांना ही उद्याने उत्तम मार्गदर्शक व माहितीपूर्ण अभ्यासक होण्यास मदत करतील. येत्या काळात ही उद्याने आणखी जैवविविधतेने विकसित करण्याचा प्रयत्न राहील. - सुरेश साळुंखे (मुख्य उद्यान अधीक्षक, पिं. चिं. मनपा)