पुणे : पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रश्नांना मनसोक्त उत्तरे दिली. शरद पवार यांची मुलाखत घेताना राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवरील अनेक प्रश्नांची विचारणा केली. यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत दिली. दरम्यान, या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी रॅपिड फायर राऊंड घेत काही झटपट प्रश्न शरद पवारांना विचारले. या रॅपिड फायर राऊंडमधील शेवटचा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला असता त्या प्रश्नाचे शरद पवार यांच्याकडून उत्तर ऐकण्यास स्वत: राज ठाकरे यांच्यासह उपस्थितांना उत्सुकता लागली होती. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांना विचारलं की, ' राज की उद्धव?', यावर शरद पवारांनी आपल्याच शैलीत उत्तर दिले.... ठाकरे कुटुंबीय ! जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप यांनी शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. पवारांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा मुलाखतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी राजकारणातल्या दोन पिढ्यांचा मेळ घालणारी ही मुलाखत ऐकण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान, कोरेगाव-भीमा हिंसाचारामुळे 3 जानेवारीला नियोजित मुलाखतीचा हा कार्यक्रम रद्द केला होता.
राज की उद्धव ? राज ठाकरेंचा शरद पवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 9:45 PM