शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

शब्द पवारांचे, भाषण फडणवीसांचे, हल्ला ठाकरेंवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 9:23 AM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने फक्त ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली...

पुणे : भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेशरद पवार यांना लक्ष्य करण्यात आले. शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची १० वाक्यांचे जाहीर वाचन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने फक्त ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली.

बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी झालेल्या या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे तसेच पक्षाचे केंद्र तसेच प्रदेश पातळीवर अनेक नेते उपस्थित होते.

फडणवीस यांनी वेगवेगळ्या शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, ‘वज्रमूठबद्दल काय बोलणार? वज्रमूठचा निर्माता असलेले शरद पवार त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात वज्रमूठचा चेहरा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणतात पाहा, असे सांगून फडणवीस यांनी त्या पुस्तकातील १० वाक्येच वाचून दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, ‘पवार म्हणाले, तेच आम्ही म्हणत होतो, तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवले.’

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालाचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, ‘त्या निकालानंतर तरी त्यांना जाग येईल, असे वाटले होते. तसे झालेले नाही. उद्धव ठाकरे यांनी ८ मागण्या केल्या होत्या. त्या मागण्याही फडणवीस यांनी वाचून दाखवल्या, प्रत्येक मागणीनंतर ते न्यायालयाने हे मान्य केले का? असा प्रश्न विचारून प्रेक्षागृहातील भाजप कार्यकर्त्यांकडून ‘नाही’ सामूहिकपणे म्हणून घेत होते. ‘असे असूनही ते म्हणतात गावोगाव निकाल सांगू. सांगा, बडवा! आमच्या बापाचे काय जाते! सरकार पूर्ण घटनात्मक आहे. न्यायालयानेच तसे स्पष्ट केले आहे. हे सरकार कार्यकाळ तर पूर्ण करेलच, शिवाय पुन्हा निवडून येईल,’ असा दावा फडणवीस यांनी केला व त्यावरही कार्यकर्त्यांकडून टाळ्या घेतल्या.

फडणवीस यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले. ‘मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे,’ असे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी टीआरपी कसा खेचावा यासाठी शरद पवारांचा क्लास लावावा, असे फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीची संभावना त्यांनी विश्वासघाताचे सरकार अशी केली. ‘खंडणीखोरांपासून दाऊदशी संबंध असलेला मंत्रिमंडळात होता. मुख्यमंत्र्यांना अडीच वर्षांत केवळ काही तास आपण मंत्रालयात बघितलं. मोठ्या मोठ्या लोकांची गळचेपी होताना आपण बघितले. पोलिसांच्या बदल्यांमध्ये होणारं कांडही आपण पाहिलं. एक पक्ष भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे मिळवणारा व तिसरा भाकरी फिरवणारा,’ अशी त्यांनी भाकरी फिरवावी लागते यावर कोटी केली.

पवारांच्या पुस्तकातील फडणवीसांनी सांगितलेले १० मुद्दे

- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरेंबाबत नव्हती.

- उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी नसे, जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती.

- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला नव्हती

- कुठे काय घडतंय, याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष नसे.

- उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची, याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं, ते नव्हतं.

- त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं. ते टाळता येणं त्यांना जमलं नाही.

- महाविकास आघाडीचं सरकार कोसळत असताना त्यांनी संघर्ष न करता पहिल्याच टप्प्यात माघार घेतली.

- उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते. परंतु, ऑनलाइन पद्धतीने.

- दुसरीकडे राजेश टोपे, अजितदादा आणि इतर मंत्री प्रत्यक्ष प्रशासनाच्या संपर्कात होते.

- उद्धव ठाकरेंचं फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडले नव्हते.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे