शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार; रामदास आठवलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 4:33 PM

शरद पवारांच्या घरावरचा हल्ला ही अतिशय निंदनीय बाब आहे

पुणे : उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला. आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदाेलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली हाेती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

संपूर्ण महाराष्ट्रात या हल्ल्याचे त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शरद पवारांच्या घरावर हल्ला होणे हि अतिशय निंदनीय बाबा असल्याचे राजकीय नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच केंदीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या घटनेबाबत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पवारांच्या घरावरच्या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले आहेत. पुण्यात बालगंधर्व येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनतर्फे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

 आठवले म्हणाले, शरद पवारांच्या घरावरचा हल्ला ही अतिशय निंदनीय बाब आहे. राज्य सरकारकडून एसटी कामगारांच्या आंदोलनाला चिघळवणाचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनाला असं वळण देणं योग्य राहणार नाही. पवारांच्या घरावरच्या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याची टीका आठवले यांनी केली आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना सेवा पुरवल्या आहेत. राज्य सरकारने आतातरी विलीनीकरणचा निर्णय घ्यावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. पगार मिळाला नाही. विलीनीकरण झाले तर खूप मोठी अडचण येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे 

मशिदवर भोंगे लावू नका ही भुमिका योग्य नाही 

राज ठाकरेंच्या भोंगे या प्रकरणाबाबत बोलताना आठवले म्हणाले, मी मनसेच्या भूमिकेशी सहमत नाही. त्यांनी भोंगे लावले म्हणून आम्ही भोंगे लावू हे योग्य नाही. राज ठाकरेंच्या भूमिकेत मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायला बंदी नाही. पण मशिदवर भोंगे लावू नये ही भुमिका योग्य नाही. राज ठाकरे मोठे नेते आहेत. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे पण ते त्यांचे वारसदार नाहीत. उद्धव ठाकरे हे वारसदार आहेत. बाळासाहेब असते ते त्यांनी उद्धव ठाकरे यांना आघाडीसोबाबत जाऊ दिले नसते. उद्धव ठाकरेंनी त्यांचा विचार बदलावा. ते निर्णय बदलत नाहीत याचं वाईट वाटतं त्यांनी निर्णय बदलावा आणि आमच्या बरोबर सत्तेत यावं यासाठीही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसे