शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

मोठी बातमी! आमदार उदय सामंतांच्या ताफ्यावर ठाकरे समर्थकांचा हल्ला, कारची काच फोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 10:16 PM

पुण्यात उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात समोरासमोर आला. यावेळी ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी 'गद्दार गद्दार' अशी घोषणाबाजी करत उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्लाबोल केला.

पुणे-

पुण्यात उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात समोरासमोर आला. यावेळी ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी 'गद्दार गद्दार' अशी घोषणाबाजी करत उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. यात शिवसैनिकांनी पाण्याच्या बाटल्या, चपला आणि दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या हल्ल्यात आमदार उदय सामंत यांच्या कारची काच फुटली असून कारमधील सहकारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

पुणे पोलिसांनी याप्रकरणी चार शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. पुण्यात आज कात्रज परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा एकाच वेळी कार्यक्रम होता. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरासमोर येऊन तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसाच काहीसा प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं आहे. 

आदित्य ठाकरे आणि उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात आला होता. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी उदय सामंत यांचा ताफा पाहताच घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यास सुरुवात केली. गर्दी आवरताना पुणे पोलिसांची दमछाक होताना पाहायला मिळाली. गर्दी इतकी होती की पोलिसांनाही गर्दी आवरणं शक्य होत नव्हतं. शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या कारपुढेच गर्दी केली. यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, चपला आणि दगडफेक कारवर केली गेली. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान, उदय सामंत यांचा ताफा यानंतर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दिशेनं गेल्याची माहिती समोर आली आहे. तसंच घडलेल्या प्रकाराची पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतPuneपुणेShiv Senaशिवसेना