पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पार्टनर कोण-कोण आहेत? मुख्यमंत्र्यांच्या साथीदाराचे संबंध कसाबशी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. य़शवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे राईट हँड आहेत. जाधव यांनी जवळपास १ हजार कोटींचा घोटाळा केला आहे, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.
हेमंत करकरेंचं बुलेटफ्रुफ जॅकेट बोगस होतं, असा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला आहे. हे बुलेटप्रुफ जॅकेट विमल अग्रवाल यांच्याकडून पुरवले गेले होते. समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून हे जॅकेट पुरवले गेले होते. ही कंपनी यशवंत जाधव आणि बिमल अग्रवाल यांनी पार्टनर कंपनी आहे, अस सोमय्या यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, शिवसेना नेते, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ५३ इमारती आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून घोषित केल्या आहेत. यशवंत जाधव हे बिमल कुमार, रामगोपाल अग्रवाल यांचे भागीदार आहेत. बिमल अग्रवाल यांचा बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा जग प्रसिद्ध आहे. कसाब हत्याकांडच्या वेळेला हा घोटाळा उघडकीस आला होता. बिमल अग्रवाल यांनी आणि यशवंत जाधव सोबत यांनी पार्टनरशिपमध्ये कंपनी सुरू केली. त्या कंपनीचे नाव समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स ( Samarth Erectors and Developers) असं आहे. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स या भागीदारी कंपनीने बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. कडून ८०० कोटी रुपयांची मलबार हिल येथील एक मालमत्ता विकत घेतल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला.
समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्सचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या सोबतही आर्थिक/व्यवसायिक संबंध आहेत. समर्थ इरेक्टर्स यांनी श्रीधर पाटणकर सोबत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन/टीडीआर चे व्यवहार केले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आज दिली.