लोकमत न्यूज नेटकर्व
बाभुळगाव : पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे. धरणात २.७० टक्के इतके पाणी शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ४९१.१३५ मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा १.४४ टीएमसी इतका शिल्लक आहे.
धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातवरण आहे. कडक लाॅकडाऊनच्या काळात इंदापूरकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. पाणी पातळी कमी असतांनाही धरणातून सिनाऱ्माढा बोगदा २९६ क्युसेक, दहिगाव एलआयएस (फाटा)८५ क्युसेक, उप कॅनल (फाटा) ६५० क्युसेक, व मुख्य कॅनलमधुन सोलापूरसाठी ३ हजार १५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकुण ४ हजार १८१ क्युसेक वेगाने सोलापूर विभागासाठी पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी एक ते दोन दिवसात उणे होणार आहे.
फोटो : उजणीची पाणी पातळी कमी झाल्याने शेतकर्यांच्या उघड्या पडलेल्या विद्युत मोटारी.