शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
2
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
3
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
4
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
5
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
6
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
7
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
8
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
9
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
10
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
11
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
12
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
13
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
14
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
15
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
16
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
17
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
18
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
19
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
20
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Ujani Dam: पाऊस फुल धरण हाऊसफुल! उजनी १०० टक्के भरले; बळीराजाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:30 PM

धरणात एकूण पाणीपातळी ४९६.८१ मीटरपर्यंत पोहोचली असून एकूण पाणीसाठा तब्बल ११८ टीएमसीपर्यंत गेला आहे

कळस : उजनी धरण सध्या शंभर टक्क्यांवर गेले असून ११८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दौंडवरुनधरणात ४६ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. धरण हाऊसफुल्ल झाले असून भीमा नदीत ३० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरण पुर्ण भरले असून धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  जुलै महिन्यात झालेल्या तसेच दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात खडकवासलासह सर्वच धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ते अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणाने  १०० टक्क्यांची पाणी पातळी गाठली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण उणे पातळीत होते. उजनी जलाशयावरील खडकवासलासह १९ धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडले जाते आहे. 

उजनी धरणामध्ये पूर्वी ६० हजार क्युसेक, त्यानंतर कमी कमी होत ६ हजार क्युसेक असा विसर्ग झाला होता. दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे  विसर्गात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवार दि १२ रोजी दौंड येथून उजनी धरणात ४६ हजार क्युसेक इतके पाणी सोडले जात होते. धरणात एकूण पाणीपातळी ४९६.८१ मीटरपर्यंत पोहोचली असून एकूण पाणीसाठा तब्बल ११८  टीएमसीपर्यंत गेला आहे. त्यापैकी धरणात उपयुक्त पाणीसाठा ५३.८७ टीएमसी  झाला आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीRainपाऊसSolapurसोलापूरdaund-acदौंड