शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

उजनीची पाणी पातळी निम्म्यावर..! धरणात ५३.१२ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:16 IST

सोलापूरसाठी दुसरे आवर्तन सोडल्याने शेतकरी चिंतीत.

- तुषार हगारेभिगवण :पुणे-सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यामध्ये धास्ती भरली आहे. गतवर्षी दौंड तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान असणारा पाणलोट क्षेत्र कोरडे पडले होते. तसेच, या वर्षीही पुनरावृत्ती होईल ?, अशी धास्ती शेतकरी वर्गात भरली आहे. कारण, सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी जलाशयातून दुसरे आवर्तन सोडले असल्याने पाणी पातळीत वेगाने घट होत आहे.चालू वर्षी उजनी धरण १११ टक्के भरले होते. डिसेंबर महिन्यात पहिले आवर्तन सोडले, यामध्ये ५ टीएमसी नदीमधून सोडले आणि १७ फेब्रुवारीपासून दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. तसेच, कालव्यातून झालेली आवर्तन वेगळीच आहेत. आणखीन आता पुढे १० मार्च च्या पुढे एक आवर्तन होईल. सोलापूर जिल्ह्याच्या शेतीला या पाण्याची आवश्यकता आहेच हे कोणीही नाकारत नाही. उपसा सिंचन योजना यासुद्धा चालल्या पाहिजेत. सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सुद्धा जगाला पाहिजे. मात्र, ज्या पद्धतीने पाणी जाते आणि त्याचा उपयोग किती होतो व कोणाला होतो. हा विषय संशोधनाचा आहे. यावर पुणे जिल्ह्यातील पुढारी अगदी झोपेत आहेत की, झोपेचे सोंग घेऊन बसलेत, हे मात्र कळायला मार्ग नाही.उजनी जलाशयाच्या पाण्यावर दौंड, इंदापूर, कर्जत, करमाळा तालुक्यांतील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत, नदीकाठच्या गावांमधील शेती पूर्णतः उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाणी पातळी खाली गेल्यावर विद्युत पंप पाण्यासोबत खाली नेण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे.धरणाची पाणी पातळी ५३ टक्क्यांवर आली आहे. यामुळे पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्यास यापुढील काळात पाणी कपातीची वेळ शेतकऱ्यावर येऊ शकते. कालवा सल्लागार समितीच्या ढिसाळ कारभारामुळे व उजनी धरणाच्या खालील लोकप्रतिनिधींकडून बेकायदेशीरपणे पळवून नेण्याच्या आग्रहामुळे परिपूर्ण भरलेले धरण रिकामे होत असून, दोन महिन्यांत ५० टक्के पाणी संपलेले असून, नियोजन बाह्य पद्धतीने पाणी सोडत राहिल्यास लवकरच धरण वजामध्ये प्रवेश करेल. उजनीत बुडीत बंधारे कधी होणार ?पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधल्यास पाणी पातळी खालावल्यास शेतकरी वर्गासह पाणी वापर संस्थाना पाणी वापरण्यासाठी बुडीत बंधारे वरदान ठरतील निवडणुकांच्या काळात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, बुडीत बंधाऱ्याची निर्मिती कधी होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना तहान लागल्यावर भेडसावतो.   

सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी जलाशयातून नदी वाटे पाणी सोडण्याच्या पद्धती मुळे २५ ते ३० टीएमसी पाणी अनाठायी वाया जाते. त्यामुळे सोलापूर शहराला पाणीपुरववठा करण्याकरिता तयार होत असलेल्या समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ पूर्ण करून ती कार्यान्वित करावी. - प्रा. शिवाजीराव बंडगर उजनी धरण संघर्ष समिती.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपातAgriculture Schemeकृषी योजना