शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 5:22 PM

उजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत.

ठळक मुद्देभीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पळसदेव : तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण ७२ टक्के झाले आहे. या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून उजनीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बुधवारी (दि. २२आॅगस्ट) दुपारपर्यंत उजनी धरण ७२ टक्के झाले होते.उजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. तसेच सोलापूर महानगरपालिका यांचा पाणीपुरवठाही उजनी जलाशयातून होतो. पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने सर्वच धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, बॅकवॉटरलगतचा शेतकरी खूष आहे. बुधवारी दुपारपर्यंत उजनी धरणात दौंड येथून ६० हजार ५००  क्युसेक, तर बंडगार्डन येथून  ३४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. बुधवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग वाढत आहे. दरम्यान, उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी एक परिपत्रक काढून भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उपयुक्त साठा ९० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने या परिस्थितीत उजनी धरणातून भीमा नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप काढून घ्यावेत, तसेच नदीपात्रातून बंधाऱ्यावरून दळण -वळण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने सोलापूर, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे व सोलापूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी (मुलकी) ता. माढा व बारामती. तसेच इंदापूर, माढा, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर येथील तहसीलदार यांना प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरUjine Damउजनी धरणSolapurसोलापूरAhmednagarअहमदनगरPuneपुणे