शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

ससूनकडे अत्याधुनिक रक्त संकलन व्हॅन; पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यासाठी उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:56 PM

ससून रुग्णालयाला अत्याधुनिक फिरत्या रक्त संकलन व्हॅन मिळाली असून त्यामुळे रक्त संकलन करण्याचा वेग वाढणार आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील विविध रक्तदान शिबिरांसाठी या व्हॅनचा वापर होईल.

ठळक मुद्देरोटरी क्लब आॅप पुणेतर्फे रुग्णालयाला भेट देण्यात आली व्हॅन२०० रक्त पिशव्या साठविणे व आवश्यक तापमान राखण्याची सुविधा असलेले दोन रेफ्रिजरेटर

पुणे : ससून रुग्णालयाला अत्याधुनिक फिरत्या रक्त संकलन व्हॅन मिळाली असून त्यामुळे रक्त संकलन करण्याचा वेग वाढणार आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील विविध रक्तदान शिबिरांसाठी या व्हॅनचा वापर होईल.रोटरी क्लब आॅप पुणेतर्फे ही व्हॅन रुग्णालयाला भेट देण्यात आली आहे. क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय गाडगीळ यांच्या हस्ते रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे ही व्हॅन सुपूर्द करण्यात आली. यावेळी प्रकाश तेलंग, अरविंद बहुले, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. शैला पुराणिक, डॉ. मंगेश सांगळे, डॉ. नलिनी कडगी, डॉ. सोमनाथ सलगर आदी उपस्थित होते. ही व्हॅन पूर्णपणे वातानुकूलित असून रक्तदात्याचे रक्त संकलन करण्याची संपूर्ण सोय आहे. एकाचवेळी दोन रक्तदात्यांचे रक्त या व्हॅनमध्ये घेता येऊ शकते. एकूण २०० रक्त पिशव्या साठविणे व आवश्यक तापमान राखण्याची सुविधा असलेले दोन रेफ्रिजरेटर आहेत. रक्तदानानंतर रक्तदात्यासाठी आवश्यक शीतपेयांसाठी घरगुती फ्रीज, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून वॉश बेसिन, केमिकल टॉयलेट, शॉवर आदींची सुविधा आहे. आरोग्य शिक्षण व रक्तदानाबद्दल जनजागृतीसाठी व्हॅनमध्ये एलसीडी टीव्ही, माईक व ध्ननीप्रेक्षपक यंत्रणा बसविली आहे.

२४ हजार युनिट रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट व्हॅनमुळे ससून रक्तपेढी अधिक सुसज्ज होणार आहे. रक्त संकलनाची क्षमता वाढल्यामुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचण्यास मोलाची मदत होणार आहे. २०१७ मध्ये रक्तपेढीतर्फे सुमारे १८७ रक्तदान शिबिरे घेतली. त्याद्वारे सुमारे १४ हजार ५०२ युनिट रक्त संकलित केले. २०१८ मध्ये २४ हजार युनिट रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे, असे या वेळी डॉ. अजय चंदनवाले म्हणाले.

टॅग्स :sasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड