शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बारामतीत अनधिकृत बांधकामांचे पेव

By admin | Published: April 11, 2017 3:48 AM

नगरपालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर बांधकामांनी चांगलाच जोर धरला आहे. विशेषत: नगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील उपनगरांमध्ये असे प्रकार राजरोसपणे होत आहेत.

बारामती : नगरपालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर बांधकामांनी चांगलाच जोर धरला आहे. विशेषत: नगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील उपनगरांमध्ये असे प्रकार राजरोसपणे होत आहेत. पालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रारी झाल्यावर फक्त स्थळ पाहणी केली जाते. नोटिसा दिल्या जातात. जागेवरच कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बांधकाम करणारे अधिक वेगाने काम पूर्ण करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे. विशेषत: नगरपालिकेने क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, क्षेत्रीय अधिकारी नेमके करतात काय, या बेकायदा बांधकामांना ‘प्रोत्साहन कोणाचे,’ असा प्रश्न विचारला जात आहे. बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहनच मिळत असल्याचे चित्र आहे. या बांधकामांना कर आकारणी करताना शास्ती लावायची, असा एकच संकेत आहे. त्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या नागरीकरणामुळे येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची, याची प्रशासनालादेखील चिंता नाही. जागामालक अगदी रस्त्याला लागून बांधकाम करतात. त्यामुळे रस्ते अरुंद होतात. एकाने अतिक्रमण केले की, त्यांच्या शेजारचादेखील त्याचेच अनुकरण करतो. बारामती सत्र न्यायालय ते एमआयडीसी पेन्सील चौकापर्यंत भिगवण रस्त्याला लागून नगरपालिकेने नव्याने सेवारस्ता केला आहे. या सेवारस्त्याला लागूनच ‘टोलेजंग’ इमारती ‘विनापरवाना’ उभ्या राहिल्या आहेत. अगदी प्रमाणापेक्षा जादा ‘एफएसआय’ वापरून बेकायदेशीर इमारती उभ्या राहिल्या आहेत. या कामांच्या बाबत तक्रारी झाल्यावर नगरपालिका प्रशासनाकडून फक्त पाहणी आणि नोटिसा देण्याचे काम केले जात आहे. या नोटिसांमुळे काम थांबवण्याऐवजी ‘अधिक गतीने काम’ केले जात आहे. या मागचे गौडबंगाल काय, ते कळतच नाही. भिगवण रस्त्यालगतच सेवारस्त्याला लागून सहयोग सोसायटीसमोर असलेल्या एसटी कर्मचारी सोसायटीत सर्व नियम धाब्यावर बसवून टोलेजंग इमारतीचे काम सुरू आहे. या कामाबाबतदेखील पालिकेत तक्रारी झाल्यानंतर काम बंद होण्याऐवजी वेग वाढला आहे. त्यामुळे या पाठीमागे नेमके अभय कोणाचे, हा प्रश्न विचारला जात आहे. एकाने सर्व नियम धाब्यावर बसवून काम केले की, त्या लगतचा मिळकतधारकदेखील त्याच पद्धतीने काम करतो. त्यामुळे सार्वजनिक रस्ते अरुंद होत आहेत.गुंठेवारीचाप्रश्न कायम...बारामती नगरपालिकेच्या हद्दीतच काही वर्षांपूर्वी गुंठेवारी पद्धतीने जागा विक्री झाली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती झाली आहे. या गुंठेवारी नियमितीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. शहरातील अवचट इस्टेट, कसबा भागातील श्रीरामनगर, सिकंदर नगर, जामदार रोड, वणवे मळा यासह अन्य भागात गुंठेवारी नियमिततेचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. गुंठेवारी बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर कामे झाली आहेत. नगरपालिकेकडून त्यांना कर आकारणी केली जाते. परंतु, बांधकामे नियमित करावी, अशी मागणी या गुंठेधारकांची आहे. धोरण निश्चित करणार : देशमुखया प्रकारच्या अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात नगरपालिका आता धोरण निश्चित करणार आहे. बांधकामाची परवानगी घेतल्यानंतर, त्याच आकारानुसार काम होत आहे का, याची स्थळपाहणी नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यामार्फत केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले. एकत्रित आराखडा आवश्यक : गुजरतर वाढीव हद्दीसह सर्वच भागात बांधकामे परवानगीनुसारच झाली पाहिजे, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांचेदेखील लक्ष असले पाहिजे. स्थानिक नगरसेवकांनीदेखील याबाबत जागृत राहावे, तरच नियोजनबद्ध बांधकामे होतील. वाढीव हद्दीत त्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी पदाधिकारी आणि प्रशासन मिळून एकत्रित आराखडा तयार करतील, असे पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.