शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शहरातील अनधिकृत फेरीवाले प्रशासनाच्या रडारवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 2:32 PM

एकीकडे भरमसाठ वाहनांची वाढणारी संख्या आणि त्यामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सध्या शहराची फारच डोकेदुखी ठरत आहे. याच धर्तीवर या वाहतूक समस्येचे कारण ठरणारे अनधिकृत फेरीवाल्यांवर यापुढे प्रशासन कडक कारवाई करणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत कारवाईचा प्रशासनाचा अभिप्राय मान्य शहरातील ६,६६२ फेरीवाल्यांचे ४२० ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार

पुणे: शहरात दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांकडून देखील अनेक तक्रारी येत आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृत फेरीवाल्याचे पुनर्वसन करणे देखील शक्य नाही. यामुळे यापुढे शहरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचा प्रशासनाचा अभिप्राय स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.    प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायमध्ये महापालिकेच्या जुन्या हद्दीत व पेठांमध्ये अ, ब, क वर्गवारीतील व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यास जागा अपु-या पडत असून, त्यामुळे ड व ई वर्गवारीतील व्यावसायिकांचे वाहतुकीचे व स्थानिक नागरिकांच्या येणा-या तक्रारींच्या अनुषंगाने पुनर्वसन करणे शक्य होणार नसल्याने वाहतुकीस होणारा अडथळा विचार घेऊन कारवाई करण्याचा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे.शहरातील २८,२५२ फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यात २१ हजार ३२ फेरीवाल्यांची संगणकीय नोंदणी झाली आहे. २० हजार ६८५ फेरीवाल्यांना त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. उर्वरीत फेरीवाल्यांनी कागदपत्रे न दिल्यामुळे किंवा व्यवसाय करत नसल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र वाटण्यात आलेली नाहीत. पहिल्या टप्प्यात पहिल्या तीन वर्गवारीतील व्यावसायिकांचे पुनर्वसन मान्य झालेल्या ४२० पुनर्वसन हॉकर्स झोनमध्ये करण्यासाठी व ड व ई वर्गवारीतील व्यावसायिकांचे जागा शिल्लक राहिल्यास दुस-यास टप्प्यात पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले आहे.या बाबींना प्रभाग समिती व शहर फेरीवाला समिती यांची मान्यता घेवून मुख्य सभेच्या अन्वये उपसुचनांना मान्यता देण्यात आलेल्या महापौरांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीमध्ये (गटनेते व पदाधिकारी) वेळोवेळी मान्यता घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत शहरातील ६,६६२ फेरीवाल्यांचे ४२० ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. उर्वरीत फेरीवाल्यांच्या पुनर्वसनची कार्यवाही सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या ओटा मार्केटमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची कार्यवाही चालू असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका