लोकमात न्यूज नेटवर्क
कदमवाकवस्ती : कोरोना लॉकडाऊनमध्ये सकाळी अकरानंतर अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवसायास बंदी असतानादेखील पूर्व हवेलीत कवडीपाट टोलनाक्यावर संध्याकाळी अनधिकृतपणे बाजार भरत आहे. या ठिकाणी शारीरिक अंतराचे नियम पायदळी तुडवले जात आहे.
पूर्व हवेलीत सध्या लॉकडाऊनच्या नियमांनुसार दुपारी अकरानंतर अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस तत्काळ फिरून कारवाई करत आहेत. परंतु कवडीपाट टोलनाक्यावर संध्याकाळी परवानगी नसताना भाजीविक्रेते बाजार भरवत आहेत. या बाजारावर कारवाई करण्यात पोलिसांनी पाठ फिरवली आहे. भाजी खरेदीसाठी पुणे- सोलापूर महामार्गावर नागरिक आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. यामुळे वाहतूककोंडी होत आहे. एखादा व्यावसायिक छुप्या पद्धतीने व्यवसाय करताना सापडला तर त्याला पोलीस त्याच्याकडून ५०० ते २५०० पर्यंत दंड आकारतात. परंतु याठिकाणी सर्रासपणे बाजार सुरू असूनदेखील कारवाई होत नसल्याने इतर व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
फोटो : कवडीपाट टोलनाक्यावर भरलेला अनधिकृत भाजीपाला बाजार.