कर्वेनगर : कर्वेनगरपासून वारजे, तसेच हायवे सर्व्हिस रस्ता, न्यू आहिरेपर्यंत अनेक कार्यकतर््यांनी राजकीय पाठबळावर पदपथावर अनधिकृतपणे उभारलेले फटाका स्टॉल महानगरपालिकेने जमीनदोस्त केले. या कर्वेनगर वारजे परिसरात ३० अनधिकृत फटाका स्टॉल अतिक्रमण विभागाने हटविण्याची कठोर कारवाई केली. या अतिक्रमणांमुळे नागरिकांना पदपथावर चालणेही अडचणीचे झाले होते.अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषानुसार या कोणतेही नियम पाळले गेले नाहीत.न्यायालयाचा अवमान होत होता. त्यामुळे सकाळी ११ वाजता पुणे महानगरपालिका आणि बांधकाम विभाग, तसेच कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाने ही कारवाई केली आहे. नागरिकांच्या मनपाकडे तक्रारी वाढत चालल्या होत्या. त्यामुळेही कारवाई झाली.या वेळी अतिक्रमणविरोधी उपायुक्त माधव जगताप, झोनल आधिकारी उमेश माळी, अतिक्रमण निरीक्षण राजेश खुडे, उमेश नरुले, आणि पालिका पोलीस कर्मचारी उपस्थित होते.पदपथावर असलेल्या स्टॉलचे पत्रे, लाकडी बांबू तसेच फटाके काढून टाकण्यात आले आहेत. या वेळी काही व्यावसायिक स्वत: होऊन मंडप काढताना दिसत होते. वारजे परिसरात पोलीस ठाणे, अग्निशमन दल, तसेच अतिक्रमण विभाग, पथविभाग इतर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे फटाका स्टॉलचे अतिक्रमण झाले होते. न्यायालयाने ठरवून दिलेले निकष पाळले नसल्यामुळे नागरिकांच्या हितासाठी ही कारवाई करण्यात आली.
अनधिकृत स्टॉल जमीनदोस्त , कर्वेनगर, वारजे परिसर : पालिकेची ३० फटाका केंद्रांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 3:26 AM