पिंपरी : दंडात्मक कारवाईची भीती न बाळगता पिंपरी-चिंचवड परिसरातील १३ अनधिकृत इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळा दर वर्षीप्रमाणे सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? असा सवाल सुजाण पालक करीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी अनधिकृत शाळांबाबत आवाज उठविल्यानंतर शहरातील १९ शाळांपैकी १३ शाळांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी शिक्षण मंडळास दिले होते. त्यानुसार केवळ नोटीस बजावून शिक्षण मंडळाचा प्रशासन विभाग मोकळा झाला आहे. अद्याप कोणत्याही शाळेवर दंडात्मक कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)अधिकारी, पदाधिकारीही उदासीन-अनधिकृत मराठी आणि इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, याबाबत प्रशासन आणि पदाधिकारी गंभीर नसल्याचे दिसून येते. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.केवळ नोटिशीचा सोपस्कार-महापालिका हद्दीतील २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात १९ अनधिकृत प्राथमिक शाळा सुरू असल्याचे शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर या शाळांना महापालिकेच्या शिक्षण मंडळाने अंतिम नोटीस २३ मार्च २०१५ ला बजावली होती. यापैकी तीन शाळा संस्थाचालकांनी बंद केल्याचे महापालिकेस कळविले आहे. तसेच दोन शाळांना शासनाची मान्यता मिळाली आहे आणि एका शाळेच्या मान्यतेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे.अनधिकृत शाळा -ज्ञानराज प्राथमिक विद्यालय, शास्त्रीनगर, कासारवाडी -छत्रपती शिवाजी मेमोरियल स्कूल, गणेशनगर, बोपखेल -पुणे गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी-चिंचवड पुलाजवळ, काळेवाडी -मायकेल प्ले ग्रुप अँड नर्सरी, मोरया पार्क, पिंपळे गुरव-आनंदीबाई वाघेरे प्राथमिक बाल मंदिर, पिंपरी वाघेरे -ब्रिलियंट सिटी पब्लिक स्कूल, धावडे वस्ती, भोसरी-मास्टर केअर इंग्रजी स्कूल, आळंदी रस्ता, भोसरी -सरस्वती हॅपी चिल्ड्रन इंग्रजी स्कूल, माऊली सोसायटी, साई पार्क, दिघी -एंजल्स प्राथमिक शाळा, क्रांतीनगर, पिंपळे गुरव -बालविकास इंग्रजी स्कूल, गणेशनगर, थेरगाव -पुनरुत्थान समरसता गुरुकुल, केशवनगर, चिंचवड-ज्ञानसागर इंग्रजी स्कूल, सोनवणे वस्ती, तळवडे, चिखली -संत तुकाराम महाराज विद्यालय, भावेश्वर सोसायटी, मोरे वस्ती.
अनधिकृत तेरा शाळाही सुरू
By admin | Published: June 16, 2015 12:01 AM