शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योगांना बिनशर्त परवानगी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 3:23 PM

जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व उद्योग- धंदे व कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा

ठळक मुद्देपुणे, पिंपरी चिंचवड व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निर्बंध उठवले 

पुणे : पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील,असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. यामुळे गेल्या सव्वा महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व उद्योग- धंदे व कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे उद्योग, कारखाने सुरू करण्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 24 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हा पासून पुणे जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी व अन्य क्षेत्रातील सर्व उद्योग-धंदे, कारखाने व खाजगी आस्थपना बंद आहेत.परंतु 3 मे पासून राज्यात प्रतिबंधित क्षेत्राताबाहेर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही कामगार किंवा कर्मचा?्याला कामावर जाण्याची किंवा प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. उर्वरित क्षेत्रातील कामगारांनी सोबत आपले ओळखपत्र बाळगावे, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कामगार किंवा कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी औद्योगिक आस्थापना, उद्योग कारखान्यांनी खास वाहतूक व्यवस्था (डेडीकेटेड ट्रान्सपोर्ट ?रेंजमेंट) करायला हवी, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.----- - पुणे जिल्ह्यात एकूण उद्योग-धंदे, कारखाने (युनिट) : 2 लाख 33, 725- जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील युनिट : 4 हजार 628- एमआयडीसी क्षेत्रा बाहेरील युनिट : 2 लाख 29 हजार 97

............................

ग्रामीण भागात सरसकट सर्व दुकाने सुरू होणार राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील रेड झोन क्षेत्राशिवाय अन्य सर्व भागात सरसकट सर्व दुकाने सुरू होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारिया यांनी लोकमतला दिली. यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून ठप्प असलेल्या सर्व बाजार पेठा पुन्हा सुरू होणार आहेत. 

पुणे जिल्ह्यात पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. यामुळे येथे रूग्णांच्या संख्येनुसार कन्टमेन्ट झोन तयार करण्यात आले आहेत. परंतु जिल्ह्यात ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात आहे. अनेक तालुके रेड झोनमधून बाहेर देखील आले आहेत. यामुळे आता ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सर्व निर्बंध उठवण्यात आले असल्याचे कटारिया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMIDCएमआयडीसीNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार