पुणे : गेल्या महिन्यात सनातन संस्थेशी निगडीत असलेल्या अनेकांना दाभाेलकरांच्या खुनप्रकरणी अटक करण्यात अाली अाहे. तसेच त्यांच्या घरात बाॅम्ब बनविण्याचे साहित्यही सापडले अाहे. त्यामुळे भाजप अाणि अारएसएसच्या विराधी जाणारे मुद्दे यांच्यावरुन लक्ष हटविण्यासाठी दलित, शाेषित, वंचितांच्या बाजूने जे अावाज उठवतायते अशा विचारवंतांना अटक करण्याचे सत्र सध्या चालवले अाहे. यात बनावट पत्रे अाणि खाेटे अाराेप ठेवले जात अाहेत. काेर्टात कुठलाही ठाेस पुरावा देण्यात अालेला नाही, त्यामुळे ही एक प्रकारची अघाेषित अाणीबाणीच असल्याचा अाराेप प्रा. अंजली अांबेडकर यांनी केला.
माओवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत देशभरात विचारवंतांना आणि मानवधिकार कार्यकर्त्यांच्या अटक सत्रांचा निषेध करत पुरोगामी संघटनांकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात अाली. त्यावेळी त्या लाेकमतशी बाेलत हाेत्या. कितीही दडपशाही झाली तरी या देशात लाेकशाही अाहे अाणि ही लाेकशाही जिवंत ठेवण्यासाठी अांबेडकरवादी तसेच पुराेगामी विचारांचे लाेक रस्त्यावर उतरुन संघर्ष करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अांबेडकर म्हणाल्या, अनेक अाघाड्यांवर भाजप सरकार अयशस्वी हाेत अाहे. रिझर्व बॅंकेचा नुकताच अालेल्य अहवालानुसार नाेटाबंदी नंतर जवळजवळ 95 टक्क्यांहून अधिक नाेटा परत अाल्या अाहेत. याचा अर्थ नाेटाबंदी केल्याने काळापैसा बाहेर येईल हा भाजपाचा दावा सपशेल खाेटा ठरला अाहे. त्याचबराेबर या नाेटाबंदीमुळे नवीन नाेटा छापण्यासाठी तसेच एटीएम मशीनमध्ये बदल करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची अाकडेवारी समाेर येत अाहे. एका बाजूला अार्थिक स्तरावरील हे अपयश अाहे. रुपयाची किंमत गडगडतीये. त्यात गेल्या महिन्यात सनातन या हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित अनेक लाेकांना दाभाेलकरांच्या खुनाप्रकरणी तसेच घरात शस्त्रसाठा ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात अाली अाहे. त्यामुळे भाजप अाणि अारएसएस यांच्या विराेधी जाणाऱ्या मुद्द्यांवरुन लक्ष हटविण्यासाठी हे अटकसत्र चालविले अाहे.