पुणे : कोराना विषाणूला रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सिग हा एकमेव उपाय आपल्या हाती आहे. त्यासाठी लॉक डाऊनच्या काळात पोलिसांची भूमिका तुम्हाला जाचक वाटत असली तरी त्यांच्या त्यामागची भूमिका तळमळ आणि कळकळ जाणून घ्या. ते तुमच्या भल्यासाठी रस्त्यावर आहे. तुम्ही घरात राहिला तरच सोशलडिस्टंन्सिग यशस्वी होणार आहे. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पुणेकरांना केले आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे़ तो अजून १४ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे, याबाबत डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलिसांची भूमिका सविस्तरपणे मांडली़. लॉकडाऊनमधील पोलिसांच्या भूमिकेविषयी डॉ. शिसवे यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये संचारबंदीचे पालन १०० टक्के करण्याची जबाबदारी ही पोलिसांवर आहे़. समाजात सोशल डिस्टंन्सिग पाळले जाईल, हे पाहणे पोलिसांचेकाम आहे.कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे अशा संशयितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ त्यांची तपासणी करण्याचे व ते घरीच आहेत, हे पहाण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविली आहे. संचारबंदीचे पालन व्हावे, यासाठी पोलिसांनी सर्व कार्यक्रम, खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये यांच्यावरबंदी घातली आहे़ जमावबंदी घातली आहे. शहरात १२१ ठिकाणी नाकाबंदी करुनसंचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे़ त्यासाठीड्रोनमार्फतही तपासणी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांच्या व्हॅनवरुनलोकांना घरामध्ये थांबण्याचे आवाहन केले जात आहे. विनाकारण घराबाहेरपडण्यास बंदी घालण्यास आली आहे़ अशा प्रकारे विनाकारण घराबाहेरपडणाºयांवर कलम १८८ खाली कारवाई करण्यात येत आहे़ खाजगी वाहनांचा वापरहोऊ नये, म्हणून खासगी वाहनांना पेट्रोल देण्यास बंदी करणारे देशातीलपुणे हे पहिले शहर आहे़ काहींचा अपवाद वगळता लोकांचा यालाचांगला प्रतिसाद मिळत आहे.अत्यावश्यक कारणांसाठी जसे दुध, किराणा, औषधे यासाठी लोकांना घराबाहेरपडायला बंदी घालण्यात आलेली नाही़ मात्र, त्यांनी त्यासाठी वाहनांचा वापरकरु नये़ घराजवळील दुकानात पायी जाऊन सोशल डिस्टंन्सिंग पाळून आवश्यक तीखरेदी करावी़ हॉस्पिटल तसेच अतिअत्यावश्यक कामांसाठी लोकांना घराबाहेरपडण्याची गरज भासते़ त्यांच्यासाठी डिजिटल पासची व्यवस्था करण्यात आलीआहे. लोकांनी पोलिसांच्या वेबसाईटवरुन फॉर्म भरुन दिला तर त्यांचे कारणलक्षात घेऊन ते योग्य वाटल्यास त्यांना जरुरीपुरती परवानगी दिली जाते.कोरोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पुणेकरांनी आणखी काळजीघेण्याची गरज आहे. पोलिसांनी जर तुम्हाला हटकले अहंकार बाळगू नका.त्यामागची तुमच्या सुरक्षेची भावना लक्षात घ्या. सोशल डिस्टंन्सिंग शिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. त्यामुळे पुणेकरांनी पोलिसांना सहकार्यकरावे, असे आवाहन डॉ़ शिसवे यांनी केले आहे..............................आणखी काही दिवस सोशल डिस्टंन्सिग पाळा लॉकडाऊनचा अर्धा टप्पा पार पडला आहे. अजून अनेक दिवस आपल्याला सोशल डिस्टंन्सिग पाळायचे आहे. या कठीण काळात पुणेकरांनी आवश्यक सूचनांचा आदर करुन त्यांचे पालन केले तरच आपण कोरोनाच्या विषाणूवर मात करु शकू.त्यासाठी सर्वांना पोलीस, डॉक्टर व प्रशासनाला साथ देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.