कोरोना हा एक निर्जीव विषाणू आहे. विषाणू म्हटले की तो निर्जीवच असणार ना! आपण वस्तू वापरतो ना... त्या निर्जीव असतात, असाच आहे हा विषाणू. या वस्तू ज्याप्रमाणे स्वत:हून आपणहून नष्ट होत नाहीत, जोपर्यंत आपणहून माणसं त्या नष्ट करत नाही, तसाच हा विषाणूही नष्ट होत नाही. मग आता हा प्राणघातक विषाणू नष्ट करायचा कसा? त्यासाठी आपल्याला खबरदारीने वागले आणि वावरले पाहिजे. सर्व पृष्ठभाग दैनंदिन वापरण्याच्या वस्तू या वारंवार निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.
सध्याची परिस्थिती पाहता हा विषाणू त्याच्या साेनेरी स्थितीत आहे. आज विश्वात कोरोनाचा शिरकाव होऊन १ ते २ वर्षे उलटून गेली आहे. कोणताही विषाणू वेळेसोबत त्याची वागणूक, गुणधर्म बदलतोच. २ ते ३ वेळा बदलतोच आणि सध्या आपण बहुतांश या बदललेल्या विषाणूचा अनुभव करतोय अशा परिस्थितीत लशीमुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती.
या नवीन स्वरूपातील कोरोनाचा सामना कसा करेल?
WHO लॅनसेटच्यानुसार हा कोरोना विषाणू बोलताना, खोकताना, शिंकण्यातून पसरत होता. आता त्याचे माध्यम हवा झाले आहे. जो विषाणू स्वत:चे स्वरूप, रूप, परिणाम, वाहण्याचे माध्यम यात बदल करू शकतो.
आज या दोन वर्षांच्या कालखंडात या विषाणूने त्याचा समतोल साधलाय म्हणणे वावगे ठरणार नाही. हा समतोल जर X - रेषा ही व्हायरसची मृत्यूचे प्रमाण आणि Y- रेषा व्हायरस पसरण्याची क्षमता.
बदललेल्या विषाणूला जुने ौषध परिणामकारक ठरेल का? वैयक्तिक व्यक्तीचा विचार करता हा विषाणू घातकच आहे. त्याचा परिणाम त्याच्या कुटुंब आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर फार विपरीत करतो. पण, समाजासाठी हा उजवा ठरतो. कारण रुग्ण या परिस्थितीत ज्या सॅनिटायझरमध्ये ६०% पेक्षा जास्त इथेनाॅल, प्रोटोनाॅल असे बेस आहेत, अशा सॅनिटायझरचा प्राधान्याने वापर केला पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात वारंवार साबणाने धुणे या तिकडीचा वापर आणि
अवलंबल्याशिवाय आपण या विषाणूवर मात नाही करू शकणार.
कारण आता हा व्हायरस/विषाणू खूप हुशार होत चाललाय आहे, तर एक निर्जीव विषाणूच. पण, याचं आता नवीन रुपांतरित स्वरूप आपण लवकरच अनुभवू किंवा अनुभवतोय देखील. २०२० नंतर आज प्रत्येक जण गाफील राहून चालणार नाही. जरी Covishild & Covaccine सारख्या लशी आल्या असतील, तरी या विषाणूचा परिवर्तनाचा वेग हा अतिशय प्रचंड आहे बाबांनो! ज्याप्रमाणे सामान्य सर्दीचा विषाणू जसा तो आपल्याला एकदा सर्दी झाली की परत होत नाही का? जर सर्दीचा अगदी सामान्य हरवण्यासाठी माणसाला संयमी, जबाबदार आणि होणे गरजेचे आहे.