लासुर्णे: थोरातवाडी (ता. इंदापूर) येथील उंडेवस्ती ते वकीलवस्ती रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक कोटी सोळा लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याचे उद्घाटन आज ऑनलाइन पद्धतीने पार पडले. या वेळी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ यांनी या कामाचे भूमिपूजन केले.
या वेळी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ यांनी रस्त्याचे तसेच शिवाजी पवार यांच्या येथील मारुती मंदिराचे सामजिक सभागृहाचे भूमिपूजन केले. त्यासाठी ५ लाख रुपये आमदार फंडातून मंजूर केले तसेच उंडेवस्ती ते जाधववस्तीसाठी सचिन सपकळ यांनी अंतर्गत रस्ता साठी २० लाख निधी मंजूर केला. १ कोटी ४१ लाख एवढ्या निधी कामाचे उद्घाटने पार पडली.
यावेळी थोरातवाडी ते कावळेमळा ग्रामपंचायतसाठी व उर्वरित अंतर्गत रस्त्यांसाठी निधीच्या माध्यमातून मंजूर करू असे आश्वासन जिल्हा नियोजन सदस्य सचिन सपकळ यांनी दिले. यावेळी माजी सरपंच,केशव नगरे, ग्रामपंचायत उपसरपंच महेशराव पवार , सुभाष थोरात,शिवाजीराव पवार,राजेंद्र जगदाळे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष दिनेश थोरात,थोरातवाडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत जाधव,सचिन भिसे,राहुलकाका क्षीरसागर,नितीन साळुंखे,देविदास थोरात,रविकेत जाधव,सुरेश जाधव, कासम भाई मुलाणी,विठ्ठल तनपुरे,तानाजी किसवे पांडुरंग पवार,महेश पवार आदी उपस्थीत होते.
थोरातवाडी(ता.इंदापूर)येथील उंडेवस्ती ते वकीलवस्ती डांबरीकरणाचे उद्घाटन करताना मान्यवर.
२९०३२०२१-बारामती-०३