शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी दिग्गजांना घरी बसवले. विशेषतः वारंवार निवडणुका लढविणाऱ्या तथा एकाच घरात अनेकदा पदे भूषाविणाऱ्या अनेक उमेदवारांना मतदारांनी डावलून नवीन तरुण चेहऱ्यांना गावचा कारभार चालविण्याची संधी दिली आहे. बहुतांशी गावात राष्ट्रवादी-काँग्रेसचे अर्थातच आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचे वर्चस्व राहिले असल्याचे अधोरेखित होत आहे.
काळूस येथील ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत काळेश्वर ग्रामविकास पॅनेलने दहा जागांवर दणदणीत विजय संपादन केला आहे. तर विरोधी गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. यापैकी वार्ड क्रमांक पाचमधून नितीन काळूराम दौंडकर हे बिनविरोध निवडणूक आले होते. तर उर्वरित यशवंत रंगनाथ खैरे, मोहन ज्ञानोबा पवळे, संजय बाबुराव कदम, दत्तात्रय नामदेव पोटवडे, संदीप लक्ष्मण टेमगिरे, धनश्री गणेश पवळे, नम्रता पवन जाचक, राधाबाई पाटीलबुवा आरगडे, वृषाली बाबाजी खैरे, दिनेश भाऊसाहेब हटाळे, अश्विनी अनिल आरगडे, प्रियंका माणिक खैरे, छाया विश्वास आरगडे, सुनंदा सहादू पवळे हे चौदा उमेदवार निवडून आले आहेत.
कोयाळी - भानोबाची येथे राष्ट्रवादी पुरस्कृत भानोबादेव जनसेवा पॅनेलने आठ जागा जिंकल्या असून पाच जागांवर इतरांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे माजी उपसरपंच विकास भिवरे यांची सलग दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. तर रुपाली भानुदास आल्हाट, राहुल भानुदास आल्हाट, ऊर्मिला मोहन कोळेकर, वंदना अनिल दिघे, सतीश करू भाडळे, गणेश दत्तू कोळेकर, वैशाली बाप्पूसाहेब कोळेकर, अजय भानुदास टेंगले, विकास साहेबराव भिवरे, अलका गोरक्ष कोळेकर, सुनीता सुखदेव पांढरे, आश्विनी अशोक लडकत, देविदास अंकुश गायकवाड हे उमेदवार निवडून आले आहेत.
भोसे येथे राष्ट्रवादी पुरस्कृत श्री सदगुरू ग्रामविकास पॅनेलने ग्रामपंचायतीच्या एकूण अकरा जागांपैकी तब्बल दहा जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत विरोधकांचा धुव्वा उडविला. उर्वरित प्रभाग चारमधून शीतल ज्ञानेश्वर कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. तसेच रोहिणी पोपट पिंगळे, रंजना संजय पठारे, विश्वास पंडित गांडेकर, दिगंबर चंद्रकांत लोणारी, लंकाबाई शांताराम कुटे, चंद्रकांत सयाजी गांडेकर, प्रतीत विठ्ठल ओव्हाळ, पूजा प्रसाद गुंडगळ, अशोक विजय काळे, मीनाक्षी दिगंबर लोणारी हे दहा उमेदवार निवडून आले आहेत.
गोलेगाव - पिंपळगाव येथे राष्ट्रवादी -काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलने ९-० अशी एकहाती सत्ता प्रस्थापित करून मागील पंचवीस वर्षांची परंपरा कायम राखल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अरुण चौधरी व बाळासाहेब चौधरी यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ जागांपैकी चार जागा बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले होते. त्यापैकी वार्ड क्रमांक एकमधून दिलीप शिवाजी चौधरी, नानासाहेब चौधरी, पल्लवी काळू चौधरी तर वार्ड क्रमांक दोनमधून मयूर शिंदे यांना बिनविरोध निवडून दिले होते. तसेच अमित रामदास चौधरी, अश्विनी संतोष चौधरी, बेबीनानी नामदेव चौधरी, नीलम सुधीर चौधरी, निर्मला वाल्मीक चौधरी या पाच उमेदवारांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.
२० शेलपिंपळगाव
ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करताना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे. (छाया : भानुदास पऱ्हाड)