शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

‘मधुमती’चे उलगडले विश्व - ठमाबाई पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 2:56 AM

ठमाबाई पवार : मधुमती पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : कधी ‘मधुमती’ चित्रपट पाहिला नाही ना कधी शाळेची पायरी चढले... कधी समाजकार्य करावं असं स्वप्नातदेखील वाटलं नाही; मात्र आपल्या गावात येऊन लोक समाजाचा विचार करतात... मग आपण का करू नये? स्वत:साठी कुणीही जगतं; दुसऱ्यांसाठी जगायला शिकलं पाहिजे. अहिल्यादेवी पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारताना त्यांनी विचारलं ‘कसं वाटतंय?’ मी म्हटलं ‘१ लाख रुपयांपेक्षा १ लाख महिला कामांसाठी उभ्या राहिल्या तर एक राष्ट्रीय कार्य घडेल....’ अत्यंत आत्मविश्वासाने ठमाताई अनंत पवार ही ग्रामीण पाड्यातील ‘मधुमती’ आपल्या अनुभवाचे अवकाश उलगडत होती.

एकीकडे पडद्यावर साकार होत असलेली ‘मधुमती’ आणि दुसरीकडे वास्तव जीवनातील ‘मधुमती’चे हे सुंदर बोल रसिकांना समृद्ध करून गेले.निमित्त होते, के अँड यू फाउंडेशनच्या वतीने ‘मधुमती’ या चित्रपटाला ६० वर्षे झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या वेळी ठमाताई अनंत पवार यांना प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांची मुलगी रिंकी रॉय भट्टाचार्य व प्रसिद्ध पटकथाकार अंजुम रजबल्ली यांच्या हस्ते ‘मधुमती गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले, त्या वेळी ठमातार्इंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या प्रसंगी फौंडेशनचे सत्येंद्र राठी उपस्थित होते.ठमाताई म्हणाल्या, ‘‘कर्जत तालुक्यातील गरव कामत हे माझं गाव. अंधश्रद्धा, व्यसनं यांनी गावाला ग्रासलेलं होतं. वनवासी कल्याण आश्रमाने गावात वसतिगृह सुरू केलं. तिथं जेवण करायचं काम मिळालं. ही लोक आपल्या समाजासाठी काम करीत आहेत; मग आपण का करू नये? असा विचार आला. मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केले. महिलांशी संपर्क वाढवला व काम उभ राहिले.’’

यावेळी रिंकी रॉय भट्टाचार्य यांच्याशी अंजुम रजबल्ली यांनी संवाद साधत ‘मधुमती’सह दिग्दर्शक बिमल रॉय यांचे पैलू उलगडले. बिमल रॉय मोठे दिग्दर्शक असले तरी ते एक मोठे माणूस आणि माझे गुरू होते. सगळ्यांना ते सहकार्य करायचे. प्रत्येक चित्रपटात जमीनदाराला खालच्या पातळीवरच ठेवले संपत्तीमुळे भेदभाव होतो म्हणून ते भाड्याच्या घरात राहायचे. आम्ही भाड्याच्या घरातच जन्मलो ती त्यांची पॉलिसी होती.. ‘दो भीगा जमीन’ चित्रपटात जे दाखविण्यात आले तेच आज शेतकºयांच्या बाबतीत होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात वर्षात ७०० चित्रपट निर्मित होतात. सगळेच हिट होतील, असे दिग्दर्शकांना वाटते; पण मधुमती सर्वच दृष्टीने सुपरहिट ठरला. प्रत्येक दिग्दर्शकाला एक स्पेस हवी असते. अनेक जण म्हणतात, ‘मधुमती’ हा चित्रपट कलर करावा; मात्र कृष्णधवलची जादू कलर चित्रपटाला येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.दिलीपकुमार यांच्यावरील प्रेमाची कबुलीत्या काळात माझ्यासह सगळेच दिलीपकुमार यांच्या प्रेमात होते. घरात चित्रपटाचे संहितावाचन होते. मी खूप लहान होते, तेव्हा चित्रपटाची टीम निवासस्थानी आली होती.तेव्हा दिलीपकुमार यांना पाहून एक क्षण हृदय बंद पडल्यासारखे झाले. त्या वेळच्या त्यांचा कारचा नंबर होता ‘२४२४‘. तो आजही लक्षात आहे, अशी आठवण सांगत रिंकी रॉय भट्टाचार्य यांनी दिलीपकुमार यांच्यावरील प्रेमाची कबुली दिली. 

टॅग्स :Puneपुणे