शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

Kasba Vidhan Sabha: कसब्यात अनपेक्षित उमेदवारी; मनसेकडून गणेश भोकरे विधानसभेच्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 7:30 PM

गणेश भोकरे यांच्या नावाची चर्चा नसतानाही मनसेकडून अचानक भोकरेंचे नाव समोर आल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघातून मनसेचे गणेश भोकरे यांना निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची चर्चा नसतानाही मनसेकडून अचानक भोकरेंचे नाव समोर आल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज मनसेकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये कसबा विधानसभा मतदार संघातून गणेश भोकरे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता कसब्यातून चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुण्यात गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी ३० वर्ष भाजपकडे असणारा मतदार संघ स्वतःकडे आणला. त्यामुळे हा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला. आता पुन्हा काँग्रेसकडून धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मनसेकडून गणेश भोकरे निवडणूक लढवणार आहेत. अशातच माजी महापौर कमल व्यवहारे यांनीसुद्धा स्वराज्य पक्षात प्रवेश करत निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कसब्याची लढत चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कसब्यात धंगेकरांनी मनसेकडून एकदा विधानसभा लढवली होती. त्यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकरांचा पराभव केला होता. परंतु धंगेकरांना मताधिक्य मिळाले होते. तेव्हा ते २ नंबरवर होते. यावरून कसब्यात मनसेचे मताधिक्य असल्याचे स्पष्ट झाले. आता गणेश भोकरे या मनसेच्या निष्ठावंत आणि तरुण युवकाला पक्षाने संधी दिली आहे. भोकरे हे एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते अजून सामाजिक कामात ते सक्रिय असतात. कसब्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही दिसून आले आहे. आता भाजपसमोर अजून एक आव्हान उभे राहिले आहे. भाजप कोणाला कसब्यात संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेMahayutiमहायुतीravindra dhangekarरविंद्र धंगेकरBJPभाजपाkasba-peth-acकसबा पेठ