लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोकमत सखी मंच व रांका ज्वेलर्स आयोजित ‘नाटकांचा नजराणा’ सखी मंच सदस्यांसाठी नाटक सवलत योजनेंतर्गत आयोजित करण्यात आला होता. युवराज ढमाले कॉर्प, रोझरी ग्रुप आॅफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट व चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशन यांच्या सहयोगाने आयोजित या नाटकांच्या पर्वाला सखींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.दि. ३ डिसेंबर रोजी ‘आम्ही आणि आमचे बाप’ हे नाटक आयोजित करण्यात आले होते. यामधील मुख्य कलाकार अतुल परचुरे, अजित परब, पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे होत. दि. ४ डिसेंबर रोजी कार्टी काळजात घुसली हे नाटक आयोजित करण्यात आले होते. या नाटकात प्रमुख भूमिकेत प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान होते.दि. ५ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या दोन स्पेशल हे नाटकामध्ये मुख्य भूमिकेत जितेंद्र जोशी, गिरिजा ओक आणि रोहित हळदीकर होते.दि. ६ डिसेंबर रोजी वेलकम जिंदगी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्य भूमिकेत गिरीश ओक, भरत जाधव व शिवानी रांगोळे होते.या नाटकांच्या नजराण्यामध्ये सुवर्णसंधी योजनेंतर्गत पुणे शहर व ग्रामीण विभागातून निवडण्यात आलेल्या भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.‘नाटकांचा नजराणा’मध्ये ५0 रुपये तिकीट काढून हजारो सखींनी नाटकाचा लाभ घेतला. ही खरं तर नाट्यव्यवसायाच्या उद्याच्या यशाची नांदी आहे. लोकमतव्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमाने आजवर हे अभिनव पाऊल उचललेले नाही.- प्रशांत दामले, अभिनेतानाटक ही महाराष्ट्रातील मनोरंजक विश्वाची ओळख आहे. फेसबुक, यू ट्युबच्या जमान्यातही नाटकांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. अशीच नवनवीन नाटके-रसिकांसाठी उपलब्ध झाली पाहिजेत.- वास्तुपाल रांकासंचालक, रांका ज्वेलर्समराठी नाटकांची सफर ‘नाटकांचा नजराणा’ या कार्यक़्रमामुळे करता आली. लागोपाठ ४ दिवस सखींचा मिळणारा प्रतिसाद विलक्षण आहे. या निमित्ताने साहित्य विश्वाची ओळख झाली. नकळत समृद्ध मराठी भाषेकडे मन ओढले जात आहे.- विनय अरान्हासंचालक, रोझरी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटलक्षवेधी सेट्स, साधे पण प्रसंगाला साजेसे कपडे, चित्तवेधक संवाद, काळजाला भिडणारा अभिनय यामुळे दंग व्हायला होते. नाटक पाहणे हे निव्वळ खुराक आहे. या संपूर्ण आयोजनात सहभागी होता आले त्याबद्दल आनंद वाटतो.- युवराज ढमालेसंचालक, युवराज ढमाले कॉर्पसिनेविश्वातील ग्लॅमरपासून कोसो दूर असे हे नाटकांचं जग आहे. प्रेक्षकांसमोर थेट अभिनय, काळजाला भिडणारे संवाद, हसता हसता रडवणारे प्रसंग हे नाटकांच्या माध्यमातूनच अनुभवण्यास मिळते.- फुलचंद चाटेसंचालक, चाटे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट
लोकमत ‘नाटकांचा नजराणा’ला सखींचा अभूतपूर्व प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 3:07 AM