शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

पेटवून दिलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

By admin | Published: February 10, 2015 11:51 PM

अंजनगाव (ता. बारामती) येथे वडील आणि मुलाला शेतीच्या वादातून पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. ७) रात्री घडला

बारामती : अंजनगाव (ता. बारामती) येथे वडील आणि मुलाला शेतीच्या वादातून पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. ७) रात्री घडला. यामध्ये भाजून गंभीररीत्या जखमी झालेल्या रोझम जहांगीर मुलाणी (वय १३) या मुलाचा आज मृत्यू झाला. त्याच्या मृत्युमुळे गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी शौकत नसीर मुलाणी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे़ दरम्यान, बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार बी़ बी़ भोसले यांना निलंबित करण्यात आले आहे़ शेतीच्या वादातून सैन्यदलात असलेल्या भावाने सख्ख्या भावाला व पुतण्याला पेटवून दिले होते. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. दोघांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. रोझम हा गंभीररीत्या भाजला होता. उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली. त्याचे वडील जहांगीर मुलाणी यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यातील आरोपी शौकत नसीर मुलाणी याला पोलिसांनी अटक केली आहे.शनिवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना शौकत याने घराच्या खिडकीतून पेट्रोल, डिझेल ओतून पेटवून दिले होते. या आगीत घर देखील भस्मसात झाले. त्याचबरोबर ३ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. जमिनीच्या वादात १३ वर्षाच्या रोझमचा नाहक बळी गेला. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शौकत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)