पुणे/चाकण : शौचालयासाठी खोदलेल्या शोष खड्ड्यात पडून अवघ्या तीन वर्षे वयाच्या चिमुकलीचा पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव खुर्द (ता.खेड) येथे घडली आहे. या घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मागील चार दिवसांपूर्वी आंबेठाण येथे अशीच घटना घडून तीन भावंडांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गाथा नितीन कडूसकर (वय.३ वर्षे, रा.कोरेगाव खुर्द,ता.खेड) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
कोरेगाव खुर्द येथील माळवाडी भागात राहणाऱ्या नितीन कडूसकर कुटुंबातील गाथा ही एकुलती एक कन्या होती. या कुटुंबाने राहत्या घराच्या बाजूला सौचालयासाठी काही दिवसांपूर्वी शोष खड्डा खोदला होता.मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे शौचालयचे बांधकाम बंद ठेवण्यात आले होते. घरात कागदासोबत ही चिमुकली खेळत असताना खेळता खेळता ती शोष खड्ड्याजवळ पोहचली.आणि पाण्यात पडली.बराच वेळ गाथा दिसून आली नसल्याने घराच्या आसपास तिचा शोध घेतला असता तो कागद पाण्यावर तरंगतना दिसून आल्याने प्राथमिक अंदाज व्यक्त करून पाण्यात शोध घेतला असता ती पाण्यात आढळून आली.