आळेफाटा: जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावाजवळ क्रिकेटचा सामना सुरु असतानाच मैदानावर बुधवारी अतिशय दुःखद घटना घडली. ओझर व जांबुत हा सामना चालू असताना ओझर संघाचा नामवंत खेळाडू बाबु नलावडे (वय ४७) हा फलंदाजी करत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला अन् त्यांची प्राणज्योत मालवली.
जाधववाडी येथे क्रिकेट टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली होती. ओझर व जांबुत या दोन संघांमध्ये सामना चालू असतानाच फलंदाजी करणाऱ्या संघाचा बाबू नलावडे हृदय विकाराच्या झटका आल्यामुळे जमिनीवर कोसळला. अगदी काही क्षणातच इतर खेळाडूंनी नलावडे यांना नारायणगावला डॉक्टरकडे हलवले. पण त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. नलावडे यांच्या मृत्यूने टेनिस क्रिकेट विश्वाला अतिशय जबर धक्का बसला आहे. एखाद्या खेळाडूंचे असे मैदानावर असताना जगाचा निरोप घेतल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू व क्रिकेट रसिक यांच्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली