शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

मी चंद्रकांत दादांना सांगितलं; इथला प्रत्येक माणूस आपल्याला शिव्या देतोय; गडकरींनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 4:24 PM

सर्वांनी प्रदुषण कसं कमी करता येईल यावर लक्ष दिलं पाहिजे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी पुण्यात उड्डापुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी मांडले.

पुणे: पुण्यात मेट्रोचे जाळे वाढवले तर शहरातील वाहतूककोंडी कमी होईल. तसेच पुण्यातील हवा, जल आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कार्यक्रम आखला पाहिजे. भारतातल्या सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये पुणे अग्रेसर आहे. यामुळे सर्वांनी प्रदुषण कसं कमी करता येईल यावर लक्ष दिलं पाहिजे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी पुण्यात उड्डापुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी मांडले.

प्रदुषण कमी करण्यासाठी पोलीस आणि अँब्यूलन्स सोडून मी सर्वांचे लाल दिवे काढून टाकले. सगळ्या मंत्र्यांच्या गाड्यांचे सायरन बंद केले आहेत. मंत्र्यांसाठी सायरन आणि सलामी हा मोठा आकर्षणाचा विषय आहे, असा टोलाही गडकरींनी लगावला. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात २२१ किलोमीटर लांबीच्या २२ महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. २४) फोडला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.

भुसंपादन करून दिलं तर पुण्यात रिंग रोड बांधून देईन, ही मोठी घोषणाही याप्रसंगी गडकरींनी केली. पुणे-बंगळुरू ४० हजार कोटींचा नवा महामार्ग बांधण्याची योजना आहे. तसेच पुणे-बंगळुरू नव्या महामार्गाच्या शेजारी नवं शहर वसवायचं आणि मेट्रोने जोडता येईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

दरम्यान, नितीन गडकरी पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी पुण्यात दाखल झाले होते. यावेळी सकाळी घडलेला एक किस्सा त्यांनी सांगितला. आज सकाळी मी रस्त्याने येताना मला फार वाईट वाटलं. सगळे रस्ते बंद केले होते. चंद्रकांत दादांना मी म्हटलं की आपल्याला बरं वाटतंय कारण ट्रॅफिक नाही. पण इथला प्रत्येक माणूस आपल्याला माय-बहिणीच्या शिव्या देतोय की यांनी रस्ता बंद केला. पण झेड प्लस सुरक्षा असल्याने त्यांच्या काही प्रोटोकॉल पद्धती असतात, असं गडकरींनी यावेळी सांगितलं.

पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय-

गडकरी म्हणाले की,  माझ्या आयुष्यात पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय.  मी राजीव बजाज यांना सांगितल की जोपर्यंत तुम्ही इथेनॉलवर चालणारी गाडी तयार करत नाही तोपर्यंत माझ्याकडे येऊ नका.  त्यांनी तशी गाडी तयार केली. मी तीन ते चार महिन्यांत ऑर्डर काढतोय की सर्व प्रकारच्या कारसाठी अगदी मर्सिडीज सुद्धा  पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल अशी इंजिन बसवावी लागतील. दुचाकीही इथेनॉलवर चालवता येतील, असं गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीchandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणे