आळंदी : केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या महिला नेत्याच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेडछाड केली. या घटनेबाबत दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र कारवाई न झाल्याने स्वतः सदर केंद्रीय मंत्र्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.यावर आज आळंदीत माध्यमांशी बोलतांना मंत्री उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी. अशी प्रवृत्ती ठेचून काढाव्यात. छेडछाडीचे प्रकार घडत असतील तर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. असं म्हणत सामंत यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला.दरम्यान, तीर्थक्षेत्र आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव वर्ष ७५० वे या निमित्ताने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या पुस्तक प्रकाशन सोहळ्या निमित्त मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली. उदय सामंत इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत माझ्यावर जबाबदारी दिली होती. त्याबाबतचा डीपीआर तयार करायला सुरुवात केली आहे. एमआयडीसी, पर्यावरण विभाग, एमआरडीए, पीसीएमसी आणि पीएमसी आहे. या सगळ्यांच्या सहभागाने दोन ते अडीच हजार कोटींचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण होईल.'एकनाथ खडसेंचा संताप: “पोलीस असतानाही गुंडांचा धाक”या घटनेवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुक्ताईनगरमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. या गुंडांवर आधीच गुन्हे दाखल आहेत. यात्रेत उपस्थित असलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. मग महिलांची सुरक्षा कशी राहणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड;उदय सामंत म्हणाले,'पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:24 IST