पुणे : अाजची तरुण पिढी वाचत नाही, साेशल मिडीया, इतर गाेष्टी यांमध्येच ते वेळ घालवत असतात. त्यांची वैचारिक बैठक नसते, अशी अाेरड नेहमीच हाेत असते. परंतु तरुणांना जर समजून घेत त्यांच्या पद्धतीने जर त्यांना पाेषक वातावरण निर्माण केलं, तर ते नक्कीच वाचनाकडे वळतात. अाणि याचच उदाहरण म्हणजे पुण्यातील वारी बुक कॅफे. वेगवेगळ्या प्रकारचे थिम कॅफे अापल्याला माहित असतात. परंतु पुण्यात असा एक कॅफे अाहे की जिथे तुम्ही तासनतास तुम्हाला हवी ती पुस्तके वाचू शकता. त्याचबराेबर तुम्ही तुमचं एखादं कामही येथे बसून करु शकता. पुण्यातील काेथरुड भागात सती भावे यांनी या कॅफेची निर्मीती केली अाहे. तरुणांना शांत बसून वाचण्यासाठी एखादी त्यांची हक्काची जागा असावी या विचारातून सती भावे यांनी हा कॅफे सुरु केला. बुक कॅफे म्हंटल्यावर काेणी या कॅफेमध्ये येईल का असा प्रश्न त्यांना खरंतर पडला हाेता. मात्र अाता बसायला जागा मिळणार नाही इतकी तरुण मंडळी या कॅफेमध्ये पुस्तके वाचण्यासाठी येत असतात. इथली रचना सुद्धा तरुणांना अावडेल अशीच अाहे. तुम्हाला खुर्चीवर बसायचे असेल तर खुर्चीवर बसा किंवा सरळ पाय पसरून खाली सुद्धा तुम्ही येथे बसू शकता. त्याचबराेबर तुमचं लक्ष लागवं, तुम्ही पुस्तक वाचताना एकाग्र व्हावं यासाठी येथे शास्त्रीय संगीत सुद्धा लावण्यात येते. अाणि हाे पुस्तक वाचताना तुम्हाला काॅफीची जाेड असतेच. काॅफीचा अास्वाद घेत पुस्तकांच्या गराड्यात तरुण मंडळी या कॅफेमध्ये तासनतास विचार मंथन करतात. त्यांच्यासाठी हा कॅफे म्हणजे हक्काची जागाच झाली अाहे. एखाद्या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी यापेक्षा उत्तम जागाच नाही असेही काही तरुण सांगतात.
World Book Day: पुण्यातील 'या' कॅफेची बातच न्यारी; तरुणांनी करायलाच हवी ही 'वारी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:50 PM