शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या अभियंत्याने बनविले अनोखे यंत्र

By admin | Published: February 23, 2016 3:23 AM

कार्यालयात गेलात... कॉलेजमध्ये गेलात...तर शार्पनर, पंचिंग मशिन, स्टेपलर, स्टॅम्प पॅडसाठी धावपळ करायची गरज नाही. एकाच उपकरणात या सर्व वस्तू आता उपलब्ध आहेत.

पिंपरी : कार्यालयात गेलात... कॉलेजमध्ये गेलात...तर शार्पनर, पंचिंग मशिन, स्टेपलर, स्टॅम्प पॅडसाठी धावपळ करायची गरज नाही. एकाच उपकरणात या सर्व वस्तू आता उपलब्ध आहेत. खिशात किंवा पर्समध्ये बसेल एवढ्या पाकिटाच्या आकाराचे हे उपकरण आहे. ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या आदित्य जगताप याने हे उपकरण कल्पकतेने बनवले आहे. दैनंदिन जीवनात कामानिमित्त अनेक सरकारी कार्यालयांत विविध कामांसाठी जावे लागते. तेथे गेल्यानंतर कागदपत्रे बनविताना स्टेपलर, पंचिंग किंवा स्टॅम्प पॅड सापडले नाही, तर बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. अन्यथा दुकानात जाऊन हे साहित्य विकत घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. घरी हे सर्व साहित्य उपलब्ध असतानाही ते विकत घ्यावे लागते. यासाठी बहुउपयोगी असे, एकाच साच्यात बसणारे हे उपकरण आदित्यने बनविले आहे. धावपळीच्या प्रसंगी अशी वस्तू खिशात अथवा पर्समध्ये असेल, तर गैरसोय टळू शकते. वेळेचीही बचत होईल. आदित्यला उपकरण बनविण्याची कल्पना इंजिनिअरिंगचे तिसऱ्या वर्षाचे सबमिशन सुरू असताना आली. या उपकरणांअभावी त्याची आणि मित्रांचीही कॉलेजमध्ये धावपळ उडाली होती. त्याने दोन महिन्यांत हे उपकरण रॉड वापरून बनविले. त्या रॉडमध्ये पंचिंग, स्टेपलर, स्टॅम्प पॅड, तसेच शार्पनर बसविले व सहज-सुलभ ते कसे वापरता येईल, यावर भर दिला आणि ते उपकरण बनविले. उपकरण बनविल्यानंतर त्याने पेटंट मिळविण्यासाठी धडपड सुरू केली. अखेर त्याला यश आले आणि त्यासाठी त्याला पेटंटही मिळाले. आदित्यचे वडील आनंद जगताप यांनी त्याला संशोधनात मदत केली. त्याचप्रमाणे आई अंजली जगताप यांनी प्रोत्साहन दिले. उपकरणासाठी हर्षद मगर, गणेश दुधे, सागर सरवदे, प्राध्यापक चोपडे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)