कांचन कुल यांनी भाजपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाची चांदीची राखी फडणवीस यांना बांधली. कुल या पुणे ग्रामीणमधून भाजप यांमधून एकमेव निवडून आलेले दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. कुल कुटुंबाचा दौंड मतदारसंघ हा पवार कुटुंबाच्या बारामती विधानसभा मतदार संघाच्या सीमेवर आहे. एकेकाळी कुल कुटुंब हे पवार कुटुंबाचे निष्ठावान म्हणून ओळखले जायचे.२०१४ साली आमदार राहुल कुल यांनी पवार कुटुंबाशी फारकत घेत २०१४ रासपा व २०१९ मध्ये भाजपमधून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार २०१९ ची लोकसभा निवडणूक बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली. कुल यांचा पराभव झाला असला तरी ही निवडणूक संपूर्ण देशभर गाजली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणून राहुल कुल यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. खरंतर देवेंद्र फडणवीस हे सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव पाटील यांच्या कुटुंबीयांना व बार्शीतील भाजपाचे आमदार राऊत यांच्या मुलीच्या शुभविवाह उरकून मुंबई येथे परतत असताना अचानक आमदार कुल यांच्या आग्रहावरून कुल यांच्या निवासस्थानी आले. पाहुणचार झाल्यानंतर कांचन कुल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते यांना राखी बांधली. उपस्थितांचे स्वागत आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल व आदित्य कुल यांनी केले.
कोविड सेंटरचे श्रेय कुल यांनी दिले कार्यकर्त्यांना-
पाहुणचारानंतर फडणवीस यांच्यासोबत फोटोसेशन चालू असताना आमदार कुल यांनी समन्वयक विकास शेलार व तुकाराम ताकवणे यांना बोलावले. चौफुला येथील आपण उद्घाटन केलेले कोविड सेंटर हेच कार्यकर्ते चालवत असल्याचे कुल यांनी सांगितले. आतापर्यंत १८०० रुग्ण बरे झाल्याची माहिती दिली.
वास्तविक पाहता संबंधित कोविड सेंटर हे आमदार राहुल कुल यांची संकल्पना, नियोजन व प्रयत्नातून सुरू आहे. तरीसुद्धा त्या कोविड सेंटरचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याबद्दल कुल यांचे परिसरात कौतुक होत आहे.
फोटो ओळी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना कांचन कुल व मान्यवर.