बायोस्फिअर्स, सांस्कृतिक विद्या मंदिर शिक्षण संस्था, पुणे, देवराई संस्था, सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान, श्रीकृष्ण ट्रेडिंग, रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, रायरी सत्यवीर मित्र मंडळ, आम्ही भोरकर संस्था, सामाजिक वनीकरण, पुणे आणि सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून विद्या विकास विद्यालय व प्रशाला क्रीडांगण, सहकारनगर येथे बीजचित्र साकारण्यात आले. बीजचित्राचे अनावरण पुण्याच्या ??? उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका अश्विनी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
याप्रसंगी विविध बिजांचे पूजन उपस्थित महिला वर्गाकडून करण्यात आले. गारंबी शेंगेचे वापर करून अनोखा बीज-नाद देखील करण्यात आला. बीजचित्र किंवा बीजरांगोळी या संकल्पनेवर आधारित स्थानिक देशी वृक्षांच्या-वेलींच्या बिया आणि फळे वापरून ही अनोखी कलाकृती साकारण्यात येणार आहे. बीजचित्र हे २०२१ हजार स्क्वे. फु. इतक्या क्षेत्रफळाचे होते. कदाचित भारतातील हे पहिले अशा प्रकारचे बीजचित्र असणार आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी, आपल्या मातीतल्या बियांचा वापर केला गेला.
बीज चित्रासाठी ४५ सपुष्प वनस्पतींच्या बिया आणि काही प्रमाणात फळे यांचा वापर करण्यात आला. हे बीज महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून विषेत: १२ मावळ, चंद्रपूर, सिल्लोड, भीमाशंकर, पुणे जिल्हा, लातुर, उस्मानाबाद, इतर ठिकाणाहून संकलित करण्यात आले होते. यापुढेही शिव बीज-चित्र संकल्पना इतर अनेक ठिकाणी राबवणार आहोत.
बीजचित्राची संकल्पना डॉ. सचिन अनिल पुणेकर यांची असून, या बीजचित्राचे रेखाटन मंगेश निपाणीकर आणि सहकाऱ्यांनी केले. या अनोख्या उपक्रमास पराग शिळीमकर, रघुनाथ ढोले, विनायक जांभोरकर, दीपा मोरे, दत्तात्रय गायकवाड, सुनील जंगम, मिलिंद कुलकर्णी, अमित पुणेकर, महेंद्र पाखरे, गणेश मानकर यांचे मौलिक योगदान लाभले.