पुणे : एकीकडे काहीजण जाती धर्मांमध्ये भांडत असताना दुसरीकडे गेली 12 वर्षे पुण्यातील बेलबाग चाैकात गणपती विसर्जन मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एेक्याचे दर्शन हाेत अाहे. पुण्यातील मुस्लिम अाैकाफ वेलफेअर ट्रस्टच्या वतीने लक्ष्मी राेडवरील बेलबाग चाैकात मानाच्या पाच मंडळांच्या अध्यक्षांचे अत्तर, शाॅल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येते. यंदाही ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांच्या हस्ते स्वागत करण्यात अाले.
काल सर्वत्र लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निराेप देण्यात अाला. पुण्यातील विसर्जन मिरवणूकांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागलेले असते. सकाळी मंडई येथून मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु हाेते. या मानाच्या गणपतींच्या अध्यक्षांचे बेलबाग चाैकात दरवर्षी मुस्लिम अाैकाफ वेलफेअर ट्रस्टच्या वतीने गेल्या 12 वर्षांपासून स्वागत करण्यात येत अाहे. कालही टॅस्टच्या वतीने मानाच्या पाच गणपतींचे स्वागत करण्यात अाले. यावेळी सह पाेलीस अायुक्त रविंद्र सेनगावकर, विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डाॅ. मिलिंद भाेई, अॅड. मारुफ पटेल, हाजी इक्बाल अादी उपस्थित हाेते. यावेळी पाेलीस बांधवांना, डाॅक्टर्स, हाेमगार्ड यांना श्रमपरिहारासाठी खास रमजान ईदच्या वेळेस तयार करण्यात येणाऱ्या शिरखुर्म्याचे वाटप करण्यात अाले.
बाप्पाच्या मिरवणूकीत सर्वजण जातपात, धर्म विसरुन एकत्र येत असतात. लाडक्या बाप्पाला निराेप देण्यासाठी अलाेट गर्दी लक्ष्मी रस्त्यावर हाेत असते. अशातच मुस्लिम अाैकाफ वेलफेअर ट्रस्टच्या वतीने हिंदू-मुस्लिम एेक्याचे दर्शन घडविण्यात येत असते. मुस्लिम बांधव सुद्दा बाप्पाला मनाेभावे नमस्कार करुन निराेप देत असतात. बाप्पा हा सगळ्यांचा अाहे हाच संदेश यातून देण्यात येत असताे.