शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

विद्यापीठाकडून इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे यजमानपद काढून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 4:14 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यकारी समितीला विश्वासात न घेता परिषदेच्या तारखा पुढे ढकलल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यकारी समितीला विश्वासात न घेता परिषदेच्या तारखा पुढे ढकलल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परिषदेच्या सभासदांनी विद्यापीठाकडे भरलेले शुल्क परत करण्यास त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर परिषदेचे नवीन ठिकाण व तारखा लवकरच कळवू असे सभासदांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठावर ५५ वर्षांनंतर एका महत्त्वाच्या परिषदेचे आयोजन करण्याची संधी गमाविण्याची नामुष्की ओढावली आहे.इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या सचिव प्रा. महालक्ष्मी रामकृष्णन यांनी संकेतस्थळावर सभासदांसाठी पत्र पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निधी आणि सोयी-सुविधांअभावी परिषद नियोजित वेळेत आयोजित करणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले. विद्यापीठाने आयत्यावेळी समितीला विश्वासात न घेता परिषद पुढे ढकलली. या प्रकाराने समितीला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे, तो विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्राद्वारे कळविण्यात आला आहे, तसेच सदस्यांनी भरलेली शुल्काची रक्कम तत्काळ परत करण्यास त्यांना सांगितले आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सभासदांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. त्याबरोबर परिषदेचे नवीन ठिकाण व तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’चे निधीअभावी डिसेंबर महिन्यात आयोजन करू शकत नाही. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात याचे आयोजन करू, असे पत्र इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यकारी समितीला मंगळवारी पाठविले होते. विद्यापीठाने अचानक घेतलेल्या या पवित्र्याने कार्यकारी समितीला मोठा धक्का बसला. निधीअभावी सध्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे आयोजन करणे शक्य नाही; मात्र येत्या फेब्रुवारी-मार्च २०१९ पर्यंत निधीचे संकलन करून ही परिषद घेता येऊ शकेल. परिषदेसाठी येणाऱ्या अभ्यासकांची व्यवस्था बालेवाडीच्या गेस्ट हाऊसमध्ये केली जाणार होती; मात्र सध्या तिथे खेलो इंडियाच्या स्पर्धा सुरू असल्याने गेस्ट हाऊस उपलब्ध झाले नाहीत. अभ्यासकांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करणे खूप खर्चिक ठरेल असे इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. राधिका सेशन यांनी स्पष्ट केले होते.फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजनडाव्या विचारसरणीच्या अभ्यासकांचे वर्चस्व असलेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये केंद्र शासनाला अडचणीचे ठरू शकतील असे ठराव मंजूर केले जाण्याच्या भीतीने राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या दबावामुळे ही परिषद रद्द करण्यात आल्याचा आरोप इतिहास अभ्यासकांकडून केला जात आहे. निधी नसल्याचे कारण केवळ बहाणा असल्याचे बोलले जात आहे.याबाबत कुलगुरूंच्या वतीने बोलताना विद्यापीठाचे माध्यम समन्वयक म्हणाले, दबावामुळे परिषद रद्द झाल्याचे आरोप बिनबुडाचे असून, इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द करण्यात आली नसून, ती पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात त्याचे आयोजन केले जाणार आहे.सगळे युवा महोत्सवात व्यस्त, इतिहास परिषदेकडे दुर्लक्षसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे १९ ते २३ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या आयोजनामध्ये विद्यापीठातील प्रमुख पदाधिकारी व अधिकारी सध्या व्यस्त आहेत. या महोत्सवासाठीही दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे; मात्र त्याला निधीची कोणतीही अडचण नाही; मात्र वैचारिक मंथन घडवून आणणाºया इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या आयोजनाकडे मात्र दुर्लक्ष झाले.यजमानपद काढून घेणे अत्यंत अपमानकारकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंडियन हिस्ट्री काँग्रेस २८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधित घेण्याची घोषणा केली होती. दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. या परिषदेला दोन ते अडीच हजार इतिहास अभ्यासक उपस्थित राहणार होते. त्यांच्या प्रतिनिधी शुल्कातून मोठी रक्कम जमा होणार होती. उर्वरित रक्कम ही प्रायोजकत्व मिळवून जमा करायची होती. सहाशे कोटी रुपयांचे वार्षिक बजेट असलेल्या विद्यापीठासाठीही किरकोळ बाब होती. विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सिनेट सदस्य अशी दिग्गजांची फळी असताना निधी जमविता आला नाही. त्यामुळे यजमानपद काढून घेण्याच्या अपमानाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षण