पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोविड 19 आणि महाविद्यालयीन परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू केले आहेत.पुणे जिल्ह्यात 4 , नाशिक जिल्ह्यासाठी 2 आणि नगर जिल्ह्यासाठी 3 महाविद्यालयांची समुपदेशन केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे,असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील व राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र,विद्यापीठ अनुदान आयोगासह (यूजीसी)आणि राज्य शासनाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षांच्या निर्णयाबाबत नियोजन करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन केली होती.या समितीने दिलेल्या अहवालानुसार विद्यापीठांना समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षांबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी तसेच, तणावाच्या या काळात विद्यार्थ्यांना योग्य समुपदेशन करण्यासाठी जिल्हानिहाय व्यवस्था केली आहे.विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून किंवा ई मेलद्वारे परीक्षांबाबत प्रश्न विचारता येतील.समुपदेशन केंद्रांची जिल्हानिहाय यादी पुणे :- 1) काशिबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी 2) एच.व्ही.देसाई कॉलेज 3) आर्ट ,कॉमर्स, सायन्स कॉलेज इंदापूर4)इंपिरिअल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वाघोली --------नाशिक 1) केटीएचएम कॉलेज, नाशिक 2) के. के.वाघ कॉलेज ,नाशिक ------अहमदनगर 1) विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज2) न्यू आर्टस् ,कॉमर्स, सायन्स कॉलेज
3) मालपाणी कॉलेज संगमनेर