शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

पुणे विद्यापीठ : १६ जागांसाठी ६१ मतदान केंद्रे; तयारी अंतिम टप्प्यात; अधिसभेसाठी रविवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 6:25 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पदवीधर प्रतिनिधीसाठी पुणे, नगर, नाशिक व दादरा-नगर हवेली येथील ५८ केंद्रांवर, तर व्यवस्थापन प्रतिनिधी पुणे, नगर व नाशिक येथील ३ केंद्रांवर मतदान होणार आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पदवीधर प्रतिनिधीसाठी पुणे, नगर, नाशिक व दादरा-नगर हवेली येथील ५८ केंद्रांवर, तर व्यवस्थापन प्रतिनिधी पुणे, नगर व नाशिक येथील ३ केंद्रांवर मतदान होणार आहे. येत्या रविवारी, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरच्या १० जागांसाठी, तर व्यवस्थापन प्रतिनिधीपदाच्या ६ जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. नोंदणीकृत पदवीधरच्या खुल्या गटातील ५ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रवर्गाच्या एका जागेसाठी ३ उमेदवार, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी ६ उमेदवार, अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी २ उमेदवार, डीटी/एनटी प्रवर्गाच्या एका जागेसाठी ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. व्यवस्थापन प्रतिनिधींच्या खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रवर्गाची जागा बिनविरोध निवडली गेली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकाच उमेदवाराचा अर्ज आला होता, मात्रतो अवैध ठरल्याने ही जागा रिक्त राहणार आहे. नोंदणीकृत पदवीधरचे ४९ हजार ७६१ मतदार आहेत, तर व्यवस्थापन प्रतिनिधीसाठी २२८ मतदार आहेत. निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी दिली. केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.पसंतिक्रम नोंदवून करावे मतदानव्यवस्थापन प्रतिनिधी व पदवीधर सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी पसंतिक्रम नोंदवून मतदान करायचे आहे. हा पसंतिक्रमांक नोंदविताना तो इंग्रजी किंवा मराठी आकड्यामध्येच (अक्षरी नव्हे) नोंदविणे, पसंतिक्रमांक देण्यास १ आकड्यापासून सुरुवात करणे, केंद्रात दिलेल्या ब्लू पेनचाच वापर करणे, उमेदवाराच्या समोर ठळक दिसेल असा पसंतिक्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. यामध्ये काही चूक झाल्यास मत बाद ठरविले जाईल़प्रशासनाकडून मतदारांना ई-मेलव मेसेजद्वारे केंद्रांची माहिती४अधिसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन प्रतिनिधी व पदवीधरासाठी नोंदणी केलेल्या मतदारांना विद्यापीठ प्रशासनाकडून ई-मेल व मेसेज पाठवून त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या निवडणूक पोर्टलवर मतदान केंद्र व मतदार क्रमांक शोधण्यासाठी आॅनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून दिली.काही महाविद्यालयांमध्ये गैरप्रकार होण्याच्या तक्रारी-महाविद्यालयांतील मतदान केंद्रांमध्ये त्याच महाविद्यालयाचे प्राध्यापक हे मतदार केंद्राध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे काही महाविद्यालयांमध्ये बोगस मतदान होण्याची लेखी तक्रार काही उमेदवारांनी केली होती. शिवाजीनगरचे मॉडर्न कला व वाणिज्य महाविद्यालय, निगडीचे मॉडर्न कॉलेज आॅफ फार्मसी, बाबूराव घोलप महाविद्यालय, सांगवी आदी महाविद्यालयांमध्ये निवडणुकीच्या दरम्यान गैरप्रकार होण्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. त्या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाचा पूर्णवेळ निरीक्षक उपलब्धराहणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी सांगितले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठElectionनिवडणूक