विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा काही दिवसांवर आल्या आहेत.त्यामुळे या मर्यादा कालावधीत पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून परीक्षेसाठी नवी एजन्सी नेमल्यास पुढे ढकलाव्या लागतील. ऐन परीक्षेच्या तोंडावर परीक्षेसाठी एजन्सी नियुक्त करण्याची चर्चा सुरू झाल्याने परीक्षेचे नियोजन कोलमडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.परीक्षा जुन्या की नव्या एजन्सीद्वारे घेणार याबाबत अजूनही विद्यापीठाकडून ठोस निर्णय झालेला नाही.
परीक्षेसाठी नवीन एजन्सी नेमल्याची प्रक्रिया राबविण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रथमतः जुन्या किंवा नवीन एजन्सीकडून परीक्षा घेणार हे विद्यापीठाला स्पष्ट करावे लागणार आहे.या संदर्भात लवकर निर्णय झाला नाही तर विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागतील, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.